( प्रगत भारत । pragatbharat.com)
Venus Planet Gochar In Tula: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. असंच येत्या काळात शुक्र ग्रह गोचर करणार आहे. शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, भौतिक सुख यांचा कारक मानले जाते. त्यामुळे जेव्हा जेव्हा शुक्राच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.
शुक्र नोव्हेंबरमध्ये तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. यावेळी अचानक आर्थिक लाभ देखील होणार आहेत. जाणून घेऊया शुक्राच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
मिथुन रास (Mithun Zodiac)
शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या घरात जाणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकतं. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. बिझनेसमध्ये नवीन संधी मिळतील. पैशाशी संबंधित बाबींमध्ये विशेष फायदा होणार आहे. गेल्या काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
मकर रास (Makar Zodiac)
शुक्राच्या बदलाचा परिणाम मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकतं. नोकरीत यशस्वी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला यावेळी चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. व्यावसायिकांना मोठी रक्कम मिळू शकते. एखाद्याच्या भागीदारीत केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय शुभ परिणाम देणार आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. शुक्र तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमचे उत्पन्न वाढणार आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसेही मिळणार आहेत. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. नशीब तुमची पूर्ण साथ देणार आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )