WhatsApp New Feature WhatsApp Passkey Feature Rolled Out For Android Users As A Privacy Feature To Secure Accounts Check How It Works

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WhatsApp New Feature: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर्ल्डवाइड खूपच पॉप्यूलर आहे. कंपनी नवीन नवीन फिचर्स युजर्ससाठी आणत असते. आता कंपनीने नुकतंच अकाऊंट सिक्युरिटी लक्षात घेत एक नवीन प्रायव्हसी फिचर आणलं आहे, त्याचं नाव आहे – पासकी फिचर (Passkey Feature). हे विशेषतः Android वापरकर्त्यांसाठी आणलं गेलं आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स फिंगरप्रिंट, फेस आणि पिनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकतात. हे खास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणलं गेलं आहे. हे फिचर कसं कार्य करतं ते जाणून घेऊया.

नवीन फिचरमध्ये काय खास?

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फिचरद्वारे युजर्स फिंगरप्रिंट, फेस आणि पिनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकतात. आता तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमचं अकाऊंट सेफ आणि सिक्योर राहील.

याआधी व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी बॉटम टॅब इंटरफेस (Bottom Tab Interface) फिचर आणलं होतं. या अपडेटमुळे कम्युनिटी, चॅट, अपडेट आणि कॉलचा टॅब खालच्या बाजूला दिसेल, आधी हे ऑप्शन वरच्या बाजूला दिसायचे.

व्हॉट्सअ‍ॅपने ट्वीट करत दिली माहिती

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या फिचरची माहिती दिली. यात कंपनीने म्हटलं, अँड्रॉइड यूजर्स आता पासकी फिचरद्वारे पिन, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉकच्या मदतीने अकाऊंट लॉग इन करू शकतात, तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकण्याची गरज नाही. यासोबत तुमचं खातेही सुरक्षित राहील. व्हॉट्सअ‍ॅपच्या आधी गुगल आणि अ‍ॅपलने पासकी फिचर आणलं होतं.

iOS युजर्सला नाही मिळणार फिचरचा लाभ

iOS युजर्सला सध्या हे नवीन फिचर मिळणार नसल्याचं व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केलं आहे. येत्या काही दिवसांत हे फिचर आयफोन वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

नुकतंच लाँच करण्यात आलं होतं नवीन फिचर

व्हॉट्सअ‍ॅपने या महिन्याच्या सुरुवातीलाच युजर्ससाठी चॅनल फिचर (Channel Feature) आणलं होतं, ज्याच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर चॅनल बनवू शकतात. कंपनीचं म्हणणं होतं की, या फिचरमुळे युजर्सना चांगला अनुभव मिळेल आणि स्वत:चं मत व्यक्त करण्याची संधी मिळेल. यासाठी युजर्सना चॅनल बटणवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर क्रिएट बटणावर क्लिक करावं लागेल, याद्वारे तुम्ही तुमचं चॅनल क्रिएट करू शकता.

हेही वाचा:

रात्री झोपण्याआधी मोबाईल चार्जिंगला लावता? तर आजच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम



[ad_2]

Related posts