The sound of the ambulance siren will change

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रुग्णावाहिकेच्या (Ambulance) सायरनचा आवाज आता बदलणार आहे. रुग्णवाहिकांचे सायरन (Siren) नवजात बाळाच्या हसण्यासारखे वाजणार आहेत.

आई आणि बाळांना आनंद देणारी ‘खिलखिलाट रुग्णावाहिका सेवा’ (Khilkhilat Ambulance Service) राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु होणार आहे. पुढच्या महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासून ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी खिलखिलाहाट रुग्णावाहिका सेवा सुरू केली होती. आता हीच सेवा मुंबईतही सुरु होणार आहे. या सेवेची घोषणा महिला आणि बाल कल्याण विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या महिन्यात केली होती. आता ही योजना प्रत्यक्षात उतरणार आहे.

महिला आणि बाल कल्याण विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला 5 रुग्णवाहिका चालवल्या जाणार आहे.

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईच्या रस्त्यांवर या रुग्णवाहिका धावताना दिसणार आहे. ही रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. या रुग्णवाहिकेचा वापर विशेषत: गरोदर महिलांसाठी केला जाणार आहे.

याशिवाय लहान मुलांना रुग्णालयात दाखल करायचं असल्यास या रुग्णवाहिकेची मोफत सेवा दिली जाणार आहे. केवळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठीच नाही तर आई आणि नवजात बालकाला रुग्णालयातून घरी आणण्यासही ही रुग्णवाहिला सेवेत असणार आहे. 

रुग्णवाहिकेला बाहेरुनही रंगीत चित्र चिटकवली जाणार आहेत. नवजात बालकांच्या लसीकरणासंदर्भात या रुग्णवाहिकेत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय तुम्ही राहात असलेल्या ठिकाणापासून आसपासच्या रुग्णालयांची माहिती पुरवली जाणार आहे. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts