[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आळेफाटा, जुन्नर-पुणे : टोलच्या मुद्यावरून (Maharashtra Toll) राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगत असताना आता विद्यार्थीदेखील टोलवरून राडा करू लागली आहेत. शाळेतील विद्यार्थी (Students) आणि टोल नाक्यावरील ( Toll Naka) कर्मचारी एकमेकांना भिडले असल्याची घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील आळे फाटा लगतच्या टोल नाक्यावर हा प्रकार घडला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) टोल नाक्यावर आज तुफान राडा झाला. जुन्नर तालुक्यातील आळे फाटा लगतच्या टोल नाक्यावर हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थी अन टोल नाक्याचे कर्मचारी हे एकमेकांशी भिडले. शाळेच्या बसला टोल मगितल्याचा कारणावरून हा प्रकार घडला. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची अरेरावी ही सर्वश्रुत आहेच, पण विद्यार्थ्यांनी असं वर्तन भररस्त्यात करणं हे सर्वांसाठीच धक्का देणारं होतं. त्यामुळंच हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहचताच, पोलिसांनी देखील टोल नाक्यावर धाव घेतली. मात्र, अद्याप टोल नाक्यावरील यंत्रणेने अथवा शाळा प्रशासनाने ही पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिलेली नाही. परंतु असा प्रकार घडल्याची कबुली मात्र टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आळे फाटा पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे या राड्या मागे टोलचा मुद्दा होता की आणखी काही हे अद्यापही खात्रीशीरपणे समोर आले नाही.
दरम्यान, टोलच्या मुद्यावर काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि सरकारचे अधिकारी यांच्यात टोलबाबत काही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले होते. 29 ऑक्टोबरपूर्वी 15 जुने टोल रद्द करण्याबाबत राज ठाकरेंनी मागणी केली आहे. मुंबई एन्ट्री पॉईंट, वांद्रे सीलिंक आणि एक्सप्रेवेची कॉग तर्फे चौकशी करण्याची मागणीही राज यांच्याकडून या बैठकीत करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त टोल नाका परिसरात राहणाऱ्या लोकांना सवलतीच्या दरात पास देण्याची मागणी, एवढा टॅक्स गोळा होतोय, तो जातो कुठे? टॅक्स गोळा करतायत तर किमान रस्ते देखील चांगले पाहिजेत, अशा मागण्याही राज ठाकरेंनी केल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
[ad_2]