Pune Crime News Yerwada Jail Inmate Found Hashish Investigation By The Pune Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Yerwada jail) कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता येरवडा कारागृहातील कैद्याकडे चक्कं चरस आढळून आलं आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. कारागृहात कैद असलेल्या शुभम पास्ते याच्याकडे 25 चरस आढळून आलं आहे. शुभमला पोलीस सुनावणीसाठी न्यायालयात नेलं जात होतं. सुनावणी पार पडल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात आणलं गेलं. त्याचवेळी त्याच्याकडे चरस सापडलं. 

मागील काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण पुण्यात चांगलंच गाजत आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांवरती खरंच लक्ष दिलं जातं का? त्यांनी त्या ठिकाणी कैद्यांना सुधारणेसाठी ठेवलं जातं का? की कारागृहच मोठ्या गुन्ह्यांचे केंद्र बनलेले आहे? असे प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने विचारले जात आहेत.

शुभम पास्ते हा येरवडा कारागृहात कैद होता. एका गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयात हजर करायचं होतं. त्यानुसार शुभमला येरवडा कारागृहातून पुण्याच्या सत्र न्यायालयात घेऊन आले होते. सत्र न्यायालयात सुनावणीदेखील झाली आणि नंतर त्याला पुन्हा येरवडा कारागृहात घेऊन गेले. परत जाताना त्याची येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात आली. त्याच तपासनी दरम्यान त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आलं. हा सगळा प्रकार बंदोबस्तात असताना सुरु होता. सुनावणीसाठी नेत असताना  शुभमकडे चरल आलं कुठून?, त्याला नेमकं हे चरस दिलं कोणी?, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

कारागृहातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह…

मागील काही दिवसांपासून पुण्यातील येरवडा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कारण ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. त्यासोबतच येरवडा कारागृहातील काही कैदी ससून रुग्णालयात ठाण मांडून होते. या ससून रुग्णालयातून हे कैदी त्यांचे कामं सुरळीत करत असल्याचं समोर आलं होतं. त्यातीलच एक ललित पाटील हा चक्क रुग्णालयातून राज्यात मोठं ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यानंतर ससूनमध्ये असणाऱ्या कैदींना परत कारागृहात पाठवण्यात आलं आहे. 

ललित पाटील ताब्यात…

ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. चेन्नईत मुंबई पोलिसांनी ललितच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली.  ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ललित पाटीलला  शोधण्यासाठी जंग – जंग पछाडत होते. पण कोणतीची माहिती मिळत नव्हती.  मात्र  ललित पाटीलला एक चूक केली आणि तो पोलिसांच्या  जाळ्यात आला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Lalit Patil : नव्या नंबरवरून फोन केला, तिथेच फसला, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला नेमकं कसं पकडलं?

[ad_2]

Related posts