Lalit Patil Says He Has Threat From Pune Police Court Gives Him Police Custody Till Monday Sasoon Hospital Drug Racket Mumbai News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sasoon Hospital Drug Racket: ड्रग माफिया ललित पाटीलला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलकडून करण्यात आल्याचं एका वकिलांनी एबीपी माझाला सांगितलं आहे. ललित पाटील कुठे आणि कसा पळून गेला? याबाबतची कोणतीही चर्चा कोर्टात झाली नसल्याची माहिती मिळत आहे. 

ललित पाटीलला न्यायालयात हजर केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, “आज ललित पाटीलला हजर केल्यानंतर आरोपीनं माझ्या जिवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचं सांगितलं. त्यानंतर न्यायालयाकडून ललित पाटीलला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे ललित पाटीलला न्यायालयीन कोठडीत पाठवावं अशी विनंती केली. मात्र, सरकारी वकिलांनी सांगितलं की, हे ड्रग रॅकेट खूप मोठं आहे. यामध्ये 12 आरोपी आहे, पोलिसांनी ज्या बाराव्या आरोपीला अटक केली, त्यावेळी त्यानं सांगितलं की, तो कच्चा माल ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलला पुरवायचा आणि त्यानंतर ललित पाटील तो घ्यायचा. हे संपूर्ण ड्रग रॅकेट ससून रुग्णालयातून ऑपरेट केलं जात होतं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं. 

आरोपी ललित पाटीलनं त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप न्यायालयात फेटाळून लावले आहेत. 

दरम्यान, ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवलं गेलं असा दावा ड्रगमाफिया ललित पाटीलने एबीपी माझासमोर केला आहे. तसेच यात कोणाकोणाचा हात आहे, हे सर्व सांगेन असा इशाराही ललित पाटीलनं दिला आहे. ललित पाटील करत असलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ललित पाटील ज्या प्रकारे ससूनमधून पळाला तेव्हाच खरंतर संशयाची सुई निर्माण झाली होती. ललित पाटीलला नाशिक पोलीस शोधत असतानाच ललित पाटील नाशिकमध्येच होता ही गोष्टही समोर येत आहे. तसंच ललित म्हणतो त्याप्रमाणे ललितला पळवलं गेलं असेल तर यात कोण कोण सहभागी होतं याचा शोध घेतला गेला पाहिजे, तसेच ललितला पळवण्यात नेमका काय उद्देश होता, कोणाकोणाची नावं तपासात लपवली जात आहेत का हे प्रश्न ललितच्या दाव्यामुळे उपस्थित होत आहेत. 

ललित पाटील ससूनमधून पळाला

ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार असलेला ललित पाटील हा पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. 2 ऑक्टोबरच्या रात्री ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. ललित पाटील अंमली पदार्थांची तस्करी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 1 ऑक्टोबरला ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे आमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ललित पाटील पसार झाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lalit Patil Arrested : इकडे ललित पाटीलचे गौप्यस्फोट, तिकडे सुषमा अंधारेंनी वात पेटवली, दुसऱ्या नेत्याचंही नाव घेतलं!

[ad_2]

Related posts