Former BJP Corporator Clashed Husband In Pimpri Municipal Corporation The CCTV Footage Of The Beating Of The Builder

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या (Pune news) पतीने एका बिल्डरला (Pune Builder) लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage Video) ही कैद झालाय. महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजप आमदार महेश लांडगे (mahesh landage) यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे (sarika Borhade) यांचे पती आहेत. त्यांनी बिल्डर नरेश पटेलांवर (naresh patel) सर्वांदेखत हात उचलण्याचा (PCMC) पराक्रम केला आहे.

नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेलांची बोऱ्हाडेवाडीत जमीन आहे. सर्व्हे नंबर 644 मध्ये दोघांची जमीन एकमेकांना लागून आहे. त्याच जमिनीतून डीपी मार्ग जातो, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरुयेत. त्याची सुनावणी आज महापालिकेत होती. त्या सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेलांमध्ये वाद झाले. यातून नितीन बोऱ्हाडे यांनी आधी पटेलांच्या कानशिलात आणि नंतर लाथ ही मारली. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी बोऱ्हाडे यांना रोखलं आणि प्रकरण तिथंच निवळलं. पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

‘तुम्ही न्यायालयात जा अथवा कुठं ही जा, मला फरक पडत नाही’, असं नरेश पटेल माझ्या चुलत्याला बोलले. हे अशोभनीय होतं, त्याच रागात हे घडलं, असं मारहाणीनंतर नितीन बोऱ्हाडे यांनी स्पष्टीकरण दिलं. तर मी असं काहीच बोललो नाही, उलट डीपीनुसार मार्ग होऊ द्या. त्यानुसार झाल्यास मलाच फायदा होणार होता. त्यामुळं बोऱ्हाडे यांनीच न्यायालयात जाण्याची भाषा वापरल्याचा दावा नरेश पटेलांनी केला.

खरं तर मार्ग कोणाच्या जागेतून किती जाणार आहे? त्यातून कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होणार आहे? हा विषय वेगळा अन नितीन बोऱ्हाडे यांनी सर्वांदेखत नरेश पाटलांना अशी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणं, हे कितपत शोभणीय आहे? मुळात अशी मारहाण करण्याचा अधिकार नितीन बोऱ्हाडे यांना कोणी दिला? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच पक्षाचे असल्यानं त्यांनी याचा गैरफायदा घेतला का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत. दुसरीकडे बिल्डर नरेश पटेलांनी तक्रार करणार नसल्याचं म्हटलंय, यातून नितीन बोऱ्हाडे यांची दहशत किती आहे, हे दिसून येतंय.

इतर महत्वाची बातमी-

Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणाला सोडणार नाही; तपासानंतर अनेकांचे तोंडं बंद होतील; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांचा निशाणा

 

 

 

[ad_2]

Related posts