Pimpri Chinchwad PSI Zende Suspension May Question Who Won 1.5 Crores On Dream 11 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पिंपरी चिंचवडमधील  (Pimpri Chinchwad News) पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे करोडपती झाले. ड्रीम 11  मुळं (Dream 11) अवघ्या आठ तासांत झेंडेंना दीड कोटींची लॉटरी लागली. हा आनंद साजरा करण्यापूर्वीच झेंडेंचे त्यांच्याच पोलिसांनी निलंबन केलं.पण सध्या सोमनाथ झेंडे यांच्यावर पोलिसांनी कारवाईवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवली म्हणून की ड्रीम 11मुळं करोडपती झाला म्हणून? ही कारवाई करण्यात आली  असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळेच  या कारवाईनंतर ‘जलने की बु आ रही है’, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

लवकरात लवकर पैसे मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतंच. तसंच स्वप्न पिंपरी चिंचवड पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेनी पाहिलं अन ड्रीम 11च्या रूपानं त्यांचं हे स्वप्न सत्यात ही उतरलं. वर्ल्ड कप मॅचमध्ये झेंडेंची टीम अव्वल ठरली अन अवघ्या आठ तासांत त्यांना दीड कोटींची लॉटरी लागली. सोमनाथ झेंडे करोडपती झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, पण 2021साली लाचखोरीचा ठपका पडलेल्या झेंडेंचा हा आनंद अनेकांना सहन झाला नाही. वर्दीत त्यांनी मुलाखत देणं हे वर्तवणुकीला बाधा पोहचविणार आहे, असा ठपका ठेवत झेंडेंचे निलंबन करण्यात आले.

ड्रीम 11 या ऑनलाइन गेमिंगमध्ये जिंकलेल्या रकमेतून 30 टक्के कर आकारला जातो. म्हणजे हा खेळ मान्यताप्राप्त आहे हे उघड आहे. मग पोलिसांनी ही गेम खेळली तर त्यात वावगं काय? झेंडेंचे निलंबन करून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काय साध्य केलं? हिंमत असेल तर पोलिसांनी ड्रीम 11 वर बंदी आणून दाखवावी, असं आव्हान काही संघटनांनी दिलंय. पीएसआय सोमनाथ झेंडेंनी वर्दीत मुलाखत दिली, हे एकवेळ चूक आहे. असं मान्य केलं तरी ड्रीम 11 मधून झेंडेंनी दीड कोटी जिंकले यात गैर काय? की झेंडे करोडपती झाले हेच पिंपरी चिंचवड पोलिसांना सहन झाले नाही. 

काय आहे प्रकरण ?

झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे.  गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात  केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.   

हे ही वाचा :

 

[ad_2]

Related posts