Sunetra Pawar Birthday Banner In Warje Gone Viral Baramati Loksabha Supriya Sule Pune Political News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : भाजपने मिशन बारामती (Baramati News) हाती घेतलं आणि (Pune political News) एकच चर्चा रंगू लागली की सुप्रिया सुळे यांच्या विरोधातला उमेदवार कोण? गेल्या अनेक दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) लोकसभा निवडणुकीला उभ्या राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेचा दुसरा टप्पा म्हणजे पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले शुभेच्छांचे बॅनर्स. पुण्यातील वारजे भागात हे बॅनर लागले आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली. 

पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार, असं समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजलं आहे. सुनेत्रा पवार राज्यातील पावरफुल घराण्यातील पावरफुल सुनबाई आहेत. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायची, असं ठरवलं असल्याची चर्चा झाली होती. त्याला अजित पवारांनी पूर्णविरामदेखील दिला होता. 

वाढदिवसाच्या बॅनर्समुळे चर्चा…

पुण्यातील वारजे भागात सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संसदेचे चित्र असलेला बॅनर लागला आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बारामतीच्या दौऱ्यावर अजित पवार असताना त्यांना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या या बॅनरमधून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं आहे?

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, खडकवासला, भोर- वेल्हा हे विधानसभा मतदारसंघ येतात. खडकवासला आणि दौंड मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. यात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अजित पवार आणि दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि संजय जगताप, भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत

अजित पवारांच्या बंडामुळे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या बाजूला आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत. पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवारांमुळे निवडून आले आहे. पण पुरंदर तालुक्यातील काही जण सोडले तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूला आहे.

भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर हे दोन आमदार आहेत.  राहुल कुल यांच्या पत्नी 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. तर 2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 

मुले पार्थ आणि जय पुढे येतील की सुनेत्रा पवार उमेदवारी घेतील?

मागील महिन्यात सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे. पण खरंच सुनेत्रा पवार राजकारणात सक्रीय होतील का? सवाल विचारला जातोय त्याचे कारण आहे. सुनेत्रा पवारांची दोन मुले पार्थ आणि जय. पार्थ पवार हे आधीपासूनच राजकारणात सक्रीय आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर जय पवारदेखील राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे मुलांना राजकारणात सक्रिय करू पाहणाऱ्या सुनेत्रा पवार खरंच बारामतीतून निवडणूक लढतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय. परंतु वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरमधून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्याच उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे.

इतर महत्वाची बातमी-

NCP : एक बडा नेता आठवडाभरात शरद पवारांची साथ सोडणार, अजित पवारांसोबत येणार; अमोल मिटकरींचा दावा

[ad_2]

Related posts