MNS Leader Raj Thackeray Inauguration Of Baramati Constituency Office Of MNS In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : बारामती लोकसभा (Baramati) मतदारसंघ मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थित असलेल्या मनसैनिकाचं नाव अजित पवार होतं. हे ऐकल्यावर राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यावर मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, आपल्याला बारामती मतदारसंघाच्या कार्यालयाच्या उद्घटनावेळीच अजित पवार सापडावा. पण हा चांगला कार्यकर्ता आहे. फक्त आयुष्यात मला काका म्हणू नकोस बाबा. राज ठाकरे यांनी अशी टिपण्णी केल्यावर कार्यक्रमाच्या हशा पिकला. 

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांसाठी मनसैनिकांनो कामाला लागा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. पुण्यातील कात्रज परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना बारामती लोकसभा मतदारसंघ मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळीस त्यांनी मनसैनिकांना संबोधित केलं. 

मनसैनिकांना संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची शपथ घेतली. ते म्हणाले की, सध्या राजकाराणात राजकीय विचका झाला आहे. त्यातून आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला बाहेर काढू, अशी शपथ घेऊ. राजकारणात ज्या प्रकारे सर्वांना गृहीत धरणं सुरु आहे. त्यामुळे या गृहीत धरणाऱ्या सर्वांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे. या सगळ्यासाठी अनेकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते सगळे मनसैनिक प्रामणिकपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे आणि प्रत्येक कामाचा आढावा घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी पुण्यातील शेकडो मनसैनिक, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी राज ठाकरे यांचं जय्यत स्वागत केलं.

मनसेची लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात… 

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे पुणे दौरे वाढले आहेत. त्यातच मनसैनिकांच्या कामाचा राज ठाकरे वेळोवेळी आढावा घेताना दिसत आहे. सोबतच बैठकादेखील आयोजित करत आहेत. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे आणि बाकी नेतेदेखील कामाला लागले आहे. सध्या राज्यातील सर्वाचं लक्ष लागलेल्या पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरे यांनीदेखील लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीची जबाबदारी वसंत मोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी मनसेनं कंबर कसल्याचं दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Sunetra Pawar : बारामतीत नणंंद भावजई आमने-सामने? वाढदिवसानिमित्त लावलेल्या ‘त्या’ बॅनरमुळे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची पुन्हा चर्चा

[ad_2]

Related posts