Ajit Pawar : पालकमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातील पहिल्याच कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ, निम्म सभागृह रिकामं!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर पालकमंत्री झालेले अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आले. पण त्यांच्या या बालेकिल्ल्यातच जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या गणेशोत्सव देखावे आणि गौरी सजावट स्पर्धांचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते होतंय. आकुर्डीच्या गदिमा सभागृहात हे वितरण होतंय. 888 आसन व्यवस्था असणारं हे सभागृह निम्मं ही भरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्पर्धेत शेकडो मंडळांनी सहभाग घेतला पण अजित पवारांच्या हस्ते पार पडणाऱ्या बक्षीस वितरणाकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.

पुणे-पिंपरीत प्रदूषण वाढलं, याला आपण सगळेच जबाबदार…

पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आज प्रदूषण वाढलेलं आहे, त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत. याचं भान कोणालाच नाही, यामुळे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. डॉक्टरांनी मध्येच सांगितलं, खूपच रुग्ण संख्या वाढलेली आहे. गणपती विसर्जनवेळी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात आली. आता गणेश भक्तांनी हा मुद्दा भावनिक करू नये, काही राजकीय मंडळी स्वतःची पोळी भाजण्यासाठी असे मुद्दे उचलतात. पण पर्यावरणाचे रक्षण हाच कळीचा मुद्दा आहे, त्यामुळं नदीत विसर्जन करणं हे प्रदूषणाच्या दृष्टीने चिंतेची बाब असते, असंही ते म्हणाले.

कडक कारवाई करायला भाग पाडू नका..

हवेचं, पाण्याचं, जमिनीचं प्रदूषण होऊ नये म्हणून जशी आपण काळजी घेतो तशी ध्वनिप्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यायला हवं. लेसर लायटिंग आणि डीजे बंद करायला हवेत. इतका आवाज सोडला जातो की अनेकांना हार्ट अटॅक आलेत, काहींना बहिरेपणा आलाय. लेजरमुळं अनेकांचे डोळे खराब झालेत. आता तुम्ही म्हणाल हा कायतरी खोटं बोलतोय. पण हे खरंय, अनेक अहवाल समोर आलेत. त्यातून ही जी वस्तुस्थिती समोर आलीये, ती आपण स्वीकारायला हवी. कारण गणराया ही म्हणत असेल अरे तो डिजेचा आवाज कमी कर, पण कोण कोणाचं ऐकणार? मित्रानो आम्हाला कडक कारवाई करायला भाग पाडू नका. लेजर लाईट आणि डीजे विना गणेशोत्सव आणि इतर उत्सव साजरे करण्याचा संकल्प करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

लौकिक पुन्हा मिळवायचं आहे!

सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असं पिंपरी चिंचवडचं लौकिक होतं, तीच ओळख आपल्याला परत मिळवायची आहे. शहरातील विकासाची बिघडलेली घडी आपल्याला बसवायची आहे. असं म्हणत अजित पवारांनी 2017 ते 2022 अशी पाच वर्षे पालिकेत सत्ता भोगलेल्या भाजपवर अप्रत्यक्षपणे टिका केली.

अजित पवारांनी रोहित पवारांना फटकारले…

अलीकडे काही मंडळी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन, नको ते भाष्य करतायेत. पण या शहराचा कायापालट कोणी केला? प्राध्यापक रामकृष्ण मोरेंच्या नंतर माझ्याकडे शहराची जबाबदारी आली, त्यावेळी अनेक कठोर निर्णय घेऊन मी शहराला एका वेगळ्या उंचीवर नेहून ठेवलं. पण काही जण शहरात येऊन वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत. याकडे लक्ष वेधत असताना अजित पवारांनी रोहित पवारांना फटकारले. यानिमित्ताने काका-पुतण्याचा नव्या संघर्षांचा अंक सुरू झाला, यावर आज शिक्कामोर्तब झाला.

इतर महत्वाची बातमी-

Lalit Patil drug Case : ललितला 2020 मध्ये अटक, मात्र ठाकरेंनी त्याला प्रमुख केलं, त्याची चौकशी का नाही केली?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

[ad_2]

Related posts