Raj Thackeray Interview At Pune On World Architect Day Criticize Indian Engineering Government At Pune Beed Gust House Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raj Thackeray at Pune : पुणे : राज्यकर्त्यांना विकासाची दृष्टी असायला हवी. सौंदर्यदृष्टी सत्ते हवी. नियोजन नसल्यानं शहरं बकाल होत आहेत. लोकांना कोणत्या सुविधा पुरवायच्या याचं नियोजन हवं. गाडगे बाबांच्या राज्यात स्वच्छता शिकवावी लागते हे दुर्दैव आहे, असं रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलं आहे. जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त (World Architect Day) शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत लेखक दीपक करंजीकर (Deepak Karanjikar) यांनी घेतली. पुण्यात झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाष्य केलं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी बीड सर्किट हाऊसचा किस्सा सांगितला. बीडमध्ये सर्किटहाऊसमध्ये गेलो होतो. तिथल्या बेडरुमध्ये गेलो. बेडरुमचा मोठा हॉल होता आणि मधोमध पलंग. समजा नवविवाहित दाम्पत्य या बेडरुममध्ये गेलं तर पकडापकडी खेळणार का? मध्ये पलंग ठेवणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करताच एकच हशा पिकला. याशिवाय महाराष्ट्रातील सर्किट हाऊस बघितली तर मोठं मोठी बाथरुमं असतात, तिथे पळत पळत आंघोळ करायची का? असा टोमणा राज ठाकरे यांनी लगावला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले? 

महापालिकेत Development Planning होते पण Town Palnning होत नाही.  सौंदर्य दृष्टी सत्तेत असायला लागते. राज्यकर्त्याला ती असेल तर ती खाली पाझरते.  महापालिकेत, शासनात इंजिनिअर्स असतात पण टाऊन प्लॅनर नसतात, असं राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरे म्हणाले की, शासकीय विश्रामगृहाचे बाथरूम हे मोठ्या हॉल सारखे असते. बीडच्या इरिगेशन खात्याचे गेस्ट हाऊसमध्ये हॉलच्या मधोमध बेड ठेवला होता. तिथं नवीन जोडपं गेलं तर ते काय त्या भोवती पकडा पकडी खेळणार का?

अनेक गेस्ट हाऊसमध्ये भली मोठी बाथरूम असतात. तिथे काय पळत पळत येऊन आंघोळ करायची का ?  शिवाजी पार्कमध्ये हेरिटेजमुळे बांधकामांना परवानगी बंद केली. एक इमारत दुसरी सारखी नाही. कुठून येणार हेरिटेज? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

आपण जो विचार करतो आणि सत्ताधारी जे करतात त्यात तफावत आहे. म्हणून सगळा विचका झालाय, असंही राज ठाकरे म्हणालेत. 

पाहा जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त राज ठाकरेंची धडाकेबाज मुलाखत 

[ad_2]

Related posts