Nashik Latest News Attempt To Show Black Flags To Dr. Bharti Pawar On Behalf Of Maratha Reservation Protesters

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : नाशिकच्या (Nashik) नांदगाव येथील ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीने काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता केंद्राची काय भुमिका आहे? असा सवाल मराठा आरक्षण आंदोलकांनी उपस्थित केला. व्यासपीठावर मंत्री डॉ. पवार बोलत असतानाच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. 

देशभरासह राज्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ (Mera Mitti Mera Desh) हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील अमृत कलश यात्रा  आयोजित करण्यात येत आहे. नांदगाव पंचायत समितीच्या (Nandgaon Panchayat samiti)  मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत ‘अमृत कलश ‘ यात्रेप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) ह्या व्यासपीठावरून बोलत असतांना ‘मराठा आरक्षण’ (Maratha Aarkashan) प्रश्नावर आमच्याशी बोला असा आग्रह धरत ‘एक मराठा लाख मराठा अशा घोषणा’ देत मराठा आंदोलकांनी मंत्री पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. भिमराज लोखंडे, विशाल वडघुले, परेश राऊत यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी. यावेळी मंत्री पवार यांनी भाषण सुरूच ठेवले. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले. 

तर सैनिकांच्या स्मरणार्थ आणि देशाच्या एकतेशी संबधित असलेल्या कार्यक्रमात गोंधळ घालू नका, हे चुकीचे आहे. माझ्याशी चर्चा करा, संविधनिक पद्धतीने तुमचा प्रश्न मार्गी लावू असे सांगत कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या मराठा आंदोलकांना मंत्री पवार यांनी व्यासपीठावरूनच चांगलेच खडे बोल सुनावले. यावेळी आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी अटक केली. यानंतर भारती पवार यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करत ‘तुमच्या भावना मी नक्कीच वरपर्यंत पोहचवेल, असे आश्वासन दिले. दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री पवार यांची या आंदोलकांनी निवेदन देवून भेट घेत पुन्हा चर्चा केली. चर्चेसाठी मी केव्हाही तयार असते, मात्र असा गोंधळ घालून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी समज मंत्री पवार यांनी या आंदोलकांना दिली. 

नांदगावमध्ये अमृत कलश यात्रा आयोजन 

नांदगाव पंचायत समितीच्या वतीने ‘ मेरी मिट्टी मेरा देश ‘ या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती. नांदगाव तालुक्यातील गंगाधरी येथून निघालेल्या या पदयात्रेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांचेसह तहसील, पंचायत समिती तसेच इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. अतिशय उत्साहात निघालेल्या या अमृत कलश यात्रेत सहभागी असलेल्या प्रत्येकाने भगवा फेटा परिधान केलेला होता. सुरुवातीस वारकरी संप्रदायाचे पथक, त्यानंतर व्हीं.जे.हायस्कूलच्या एन.सी.सी.विद्यार्थ्यांचे संचलन, लेझिम पथक व त्यानंतर मंत्री भारती पवार यांचेसह मोठ्या संख्येने अमृत कलश डोक्यावर घेवून निघालेल्या महिला भगिनी असा मोठा लवाजमा गंगाधरी ते तहसील कार्यालयाचे प्रांगण अशी यात्रा काढण्यात आली. या यात्रेत दोन बैलगाड्यांच्या देखील समावेश होता. भारत माता की जय चा जयघोष करीत ही यात्रा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीचे कलश व्यासपीठासमोर ठेवण्यात आले.

इतर महत्वाची बातमी : 

Maratha Reservation : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकारण्यांना गावबंदी; नगरच्या पाथर्डीमध्ये लागला भलामोठा फ्लेक्स

[ad_2]

Related posts