[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आणखी एक (Sasoon Hospital Drug Racket) मोठी अपडेट समोर येत आहे. ललित पाटीलच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठी जबाबदारी असलेला रेहान शेख अन्सारी उर्फ “गोलू” याला आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकमध्ये एम डी ड्रग्सचा कारखान्याचा सेटअप उभारण्यासाठी अन्सारीने ललित पाटिलला मदत केल्याचं समोर आलं आहे. रेहान अन्सारी याला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून 20 ऑगस्ट रोजी अटक केली होती. पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून रेहान अन्सारीचा ताबा घेतला आहे.
रेहान शेख अन्सारी हा मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री करत होता. ललित पाटील आणि भूषण पाटीलने नाशिकमध्ये उभारलेल्या कारखान्यासाठी रेहानने मोठी मदत केली होती. ललित पाटीलने ड्रग्ज रॅकेटची मोठी जबाबदारी या रेहानकडे दिली होती. कुठे आणि कशी ड्रग्ज विक्री करायची, त्यातून किती पैसे मिळणार आहे आणि नाशिकच्या कारखान्यासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहे. याची सर्व जबाबदारी रेहानकडे होती. तो या सगळ्यांवर लक्ष ठेवत होता.
ललित पाटीलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
नाशिकमध्ये ड्रग्स बनवणारा ललित पाटील हा महाराष्ट्रातून इतर राज्यात ड्रग्ज सप्लाय करत होता. हे ड्रग्ज महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तर काही भागांमध्ये जात होते. ललित पाटील याचे कनेक्शन फक्त इथवर न थांबता दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यात देखील पसरले होते. ललित पाटील याला नाशिकमधील फॅक्टरी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मात्र ललित पाटीलचं हे ड्रग्जच साम्राज्य फक्त आंतरराज्या पुरतंच मर्यादित नव्हतं तर तो देशाबाहेर देखील पसरवण्याच्या तयारीत होता, ही माहिती देखील त्याच्यात तपासात समोर आली आहे.
नाशिकमधील सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले…
नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आल्याचे समोर आले आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणी सराफा व्यावसायिकाची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत. नाशिकचं ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असून राज्यातील तीन पोलिसांच्या टीम्स या प्रकरणात लक्ष घालत असल्याने वेगवगेळ्या ठिकाणाहून नवी माहिती समोर येत आहे.
इतर महत्वाची माहिती-
Pune PMPML New : आधी काम नंतर शौक; PMPML चालक, कंडक्टरची ब्रेथ ॲनालायझरद्वारे होणार तपासणी
[ad_2]