Indian Couples Getting Divorces Due To Unacceptable Reasons Lawyer Tanya Appachu Kaul Revealed Watch Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Reasons for Divorce: आजकाल पती-पत्नीमध्ये भांडण झालं की प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचतं. अलीकडच्या काळात अनेक देशांमध्ये घटस्फोटाच्या घटनांमध्ये (Divorce Cases) सातत्याने वाढ होत आहे. भारतात राहणाऱ्या एका वकिलाने घटस्फोटाच्या कारणांचा एक व्हिडिओ बनवला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यातून तुम्हाला घटस्फोट घेण्यासाठी जोडप्यांकडून दिल्या जाणाऱ्या विचित्र  कारणांचा अंदाज येईल.

बऱ्याचदा पती आपल्याला जास्त वेळ देत नाही म्हणून किंवा पतीचं माझ्यावर प्रेम नाही, अशा तक्रारी घेऊन महिला घटस्फोटासाठी येत असल्याचं वकिलांनी सांगितलं. इतकंच नाही तर नवऱ्याच्या पाया न पडल्याने, जेवण न बनवत नसल्याने आणि इतर अनेक कारणांमुळे देखील घटस्फोट होत असल्याचं वकिलांनी सांगितलं.


कोणत्या कारणांमुळे लोक घेत आहेत घटस्फोट?

वकील तान्या अप्पाचू कौल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याची काही खास कारणं सांगितली आहेत.व्हिडीओमध्ये वकिलांनी सांगितलं, हनीमूनला छोटे कपडे घातल्याने एका व्यक्तीने पत्नीविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली.

इतकंच नाही तर काही महिलांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे, कारण त्यांचे पती यूपीएससीची तयारी करत असून त्यांना वेळ देऊ शकत नाही. पत्नीला जेवण बनवता येत नाही आणि नाश्ता न करताच ऑफिसला जावं लागतं, यामुळेही घटस्फोटाच्या केस येत असल्याचं वकिलांनी सांगितली. वकील तान्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यानंतर लोक देखील कमेंट्समध्ये या विषयावर आपली मतं देत आहेत.

Mutual Divorce म्हणजे काय?

Mutual Divorce हा एकमेकांपासून वेगळे होण्याचा अतिशय सोपा , साधा आणि शांत मार्ग आहे. या Mutual Divorce मध्ये पती-पत्नी काही अटी एकमेकांसोबत ठरवून वेगळे होण्याचा निर्णय घेतात.  काही वेळेस या पद्धतीच्या घटस्फोटात कोणत्याही प्रकारच्या अटी नसतात. तर एकतर्फी घटस्फोट खूप कठीण आणि गुंतागुंतीचा असतो. या घटस्फोटात विभक्त होण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या परस्पर सहमतीने घेतलेला नसतो. यात केवळ पती-पत्नी या दोघांमधील एकाच जोडीदाराला विभक्त होण्याची आणि विवाह संपवण्याची इच्छा असते. भारतात परस्पर घटस्फोटाला सुमारे 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागतो. 

हेही वाचा:

World News: भारताच्या ‘या’ शेजारील देशात फक्त मुस्लिमांनाच मिळतं नागरिकत्व; प्रख्यात पर्यटनस्थळ आहे हा देश



[ad_2]

Related posts