Ind Vs Nz World Cup 2023 Today Match Dharamshala Weather Report Rain Prediction Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs NZ Weather Report : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मधील 21 वा सामना आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघामध्ये रंगणार आहे. धर्मशाला (Dharamshala) येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडिअम (Himachal Pradesh Cricket Stadium) मैदानावर दोन्ही संघ आपापसांत भिडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज एका संघाच्या विजयी वाटचालीमध्ये खंड पडणार आहे. कारण, दोन्ही संघांनी वर्ल्ड कप 2023 मधील आतापर्यंतच्या प्रत्येकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघ सलग पाचव्या विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत. मात्र, चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

धर्मशालेत पाऊस पडणार?

अ‍ॅक्यू वेचर (Accuweather) च्या रिपोर्टनुसार, पावसामुळे आज भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. आजच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. अ‍ॅक्यू वेचरच्या रिपोर्टनुसार, धर्मशालेत पाऊस पडण्याची शक्यता 40 टक्के आहे. दुपारच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते. तर, संध्याकाळी पावसाची शक्यता कमी आहे. पण तापमान सुमारे 12-13 अंशांच्या आसपास घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील धर्मशाला येथे खेळवण्यात आलेला मागील सामना देखील पावसामुळे प्रभावित झाला होता. पाऊस पडल्यामुळे हा सामना फक्त 43 षटकांचा खेळवण्यात आला होता.

विश्वचषकातील दोन्ही संघांची आकडेवारी

2019 मध्ये विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांमधला शेवटचा सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याशिवाय 2003 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताने शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. टीम इंडियाविरोधात न्यूझीलंडचं पारडं काहीसं जड आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने 5 आणि भारताने 3 सामने जिंकले आहेत. तर, एक सामना अनिर्णित राहिला होता.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts