MS Dhoni Straps Injured Knee Heavily; आयपीएल फायनलमधील धोनीचा व्हिडीओ समोर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद: गेल्या वर्षी गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानी राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं यंदा फिनिक्स भरारी घेत आयपीएल २०२३ चं जेतेपद पटकावलं. गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव करत चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. धोनी ब्रिगेडनं पाचव्यांदा स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. गुडघ्याच्या दुखापतीनंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं त्याची खेळावरील निष्ठा दाखवून दिली. शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला येणाऱ्या धोनीनं पुन्हा एकदा त्याच्या नेतृत्त्वगुणांची चुणूक दाखवली.

आयपीएलच्या संपूर्ण हंगामात धोनी गुडघ्याच्या दुखापतीसह खेळला. याचा सर्वाधिक परिणाम धोनीच्या फलंदाजीवर दिसला. धावा काढत असताना धोनीला वेगानं पळणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे फलंदाजीसाठी सातव्या, आठव्या क्रमांकावर येऊन मोठे फटके खेळण्यावर त्यानं लक्ष केंद्रित केलं. मात्र यष्टिरक्षण करताना धोनीची कामगिरी नेहमीप्रमाणे लक्षवेधी ठरली. अंतिम सामन्यात त्यानं गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलला अतिशय हुशारीनं यष्टिचीत केलं. त्यावेळचा धोनीचा वेग थक्क करणारा होता.
पायाला पट्ट्या बांधून धोनी मैदानावर उतरत होता. खेळावरील त्याची निष्ठा या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळाली. अंतिम सामन्यात धोनीला गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मानं शून्यावर बाद केलं. मात्र तरीही धोनीनं संपूर्ण आयपीएल हंगामादरम्यान दाखवलेल्या समर्पणवृत्तीचं कौतुक झालं. चेन्नईचा संघ सर्वोत्तम नव्हता. मात्र तरीही धोनीनं प्रत्येक खेळाडूचा, त्याच्या कौशल्याचा खुबीनं वापर केला. त्यामुळेच चेन्नईच्या संघानं आयपीएलच्या जेतेपदाला पाचव्यांदा गवसणी घातली.

आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर आता धोनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये धोनी फलंदाजीला जाण्याची तयारी करताना दिसत आहे. त्यात धोनी त्याच्या डाव्या पायाला पट्टा बांधताना दिसत आहे. विशेष म्हणजे धोनीनं त्याच्या चाहत्यांना पुढील हंगामात खेळण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे चाहत्यांना धोनीचा खेळ पाहण्याची संधी मिळेल.

[ad_2]

Related posts