Miss Gay Mato Grosso 2023 Pageant in Brazil Angry husband of runner up breaks winner crown; सौंदर्य स्पर्धेत बायकोला उपविजेतेपद मिळताच नवऱ्याचा राडा, मुकूटच तोडला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ब्राझिलिया : ब्राझीलमधील LGBTQ समुदायाच्या सौंदर्य स्पर्धेत एक नाट्यमय घडामोड घडली. आपला जोडीदार दुसऱ्या स्थानावर आल्याने स्पर्धकाच्या भडकलेल्या पतीने विजेतेपदाचा मुकूटच फोडला

ही घटना २७ मे रोजी मिस गे मातो ग्रोसो २०२३ च्या स्पर्धेत घडली. इमॅनुएली बेलिनी हिला विजेती घोषित करण्यात आले, तोच उपविजेती नथाली बेकर हिच्या पतीने स्टेजवर धाव घेतली. नथाली ही इमॅनुएलीचे अभिनंदन करत तिच्या शेजारी उभी असताना नथालीच्या नवऱ्याने कहर केला.

विवाहितेला लॉजवर बोलवून गळा चिरला, शेवटचा सेल्फी ठरला टर्निंग पॉईंट
बेलिनीच्या शिरावर मुकुट घातला जात असताना, नथाली बेकरच्या जोडीदाराने निवेदकाच्या हातातून मुकूट हिसकावून घेतला आणि जमिनीवर फेकला. त्यानंतर त्याने आपली पार्टनर नथालीला खेचले. यावेळी स्तब्ध झालेली गर्दी हे दृश्य पाहतच राहिली.

सुरक्षा रक्षक मंचावर येताच संबंधित व्यक्तीने जमिनीवरून मुकूट उचलला, तो तोडला आणि त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

बीड नगरपालिकेत राडा; तीन महिन्यांचं वेतन रखडलं; महिला कामगारांनी कर्मचारी अन् अधिकाऱ्यानां कोंडलं

ब्रुनो गुज्जो (@brunoguzzo) या ट्विटर यूजरने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. “मला एकाच वेळी आनंद वाटतो, भीतीही वाटते आणि अंतिम फेरीत द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या सौंदर्यवतीच्या गरम डोक्याच्या नवऱ्याचा अभिमानही वाटतो.” अशी प्रतिक्रिया एका ट्विटराईटने दिली आहे.

मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…
स्पर्धा समन्वयक मालोन हेनिश यांनी सांगितले की विजेता घोषित करण्याचा ज्युरीचा निर्णय योग्य आणि अंतिम होता. त्यांनी बेलिनी आणि बेकर या दोघांचेही अभिनंदन केले. त्रयस्थ व्यक्तीच्या विक्षिप्त वृत्तीसाठी कुठलीही महिला जबाबदार नाही, असं ते म्हणाले.

पाहा व्हिडिओ

[ad_2]

Related posts