Pune Maharashtra Israel Hamas War Effects In Pune Israel National Flag Stickers Was Stick By Unkown Person Detail Marathi News | Pune News : इस्रायल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सध्या जागतिक पातळीवर इस्रायल (Israel) आणि हमासच्या (Hamas) युद्धाचे अनेक पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच आता याचे पडसाद पुण्यात (Pune) देखील उमटत असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे पुण्याचं वातावरण बिघडवण्याचा तर प्रयत्न केला जात नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. पुण्यात रस्त्यांवर इस्रायलच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृतीचे स्टिकर्स चिटकवण्यात आलेत. दरम्यान जाणूनबुजून हे स्टिकर्स चिटकवण्यात आले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. 

दरम्यान या संदर्भात पुणे शहरातील चार पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुण्यातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक पोलीस स्थानकात वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आलेत. तर या प्रकरणामध्ये एकूण सहा आरोपी असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जातय. पोलीस संबंधित ठिकाणी जाऊन हे स्टिकर्स काढत आहेत.त्यामुळे या प्रकरणात पोलीस आता कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

इस्रायल हमासमध्ये संघर्ष सुरुच

 इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.पण हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीत. 

Israel-Hamas Death Toll : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंतची जीवितहानी

गाझा : 4469 लोक ठार, 14000 जखमी
इस्रायल : 1402 ठार, 5,007 जखमी
वेस्ट बँक : 85 ठार, 1400 जखमी
लेबनॉन : 27 ठार, 9 जखमी
एकूण : 5983 ठार, 20416 जखमी
ओलिस  : सुमारे 200 लोक बंधक

भारताकडून पॅलेस्टाईनला मदत

इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझातील नागरिकांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत आहे, तर औषधांचा साठाही अपुरा आहे. भारताने रविवारी पॅलेस्टाईनला मदतीचा हात दिला. भारताने संघर्षात अडकलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांसाठी 6.5 टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत. भारताने पॅलेस्टिनी नागरिकांच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते  अरिंदम बागची  यांनी एक्स मीडियावर ट्वीट करत दिली आहे.

हेही वाचा : 

Ajit Pawar On Maratha Reservation : बारामतीमध्ये आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव, दादा म्हणाले, EWS मध्ये…

[ad_2]

Related posts