Youtube First Video What Was Said In The First Video Of Youtube It Was About This Special Animal

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

YouTube First Video: आजकाल YouTube हे संपूर्ण जगासाठी मनोरंजनाचं एक मोठं साधन आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांचं युट्युबच्या (YouTube) माध्यमातून मनोरंजन होतं, तर दुसरीकडे लाखो लोक या प्लॅटफॉर्मच्या मदतीने लाखोंची कमाई करतात. आजकाल, युट्युबर (YouTuber) बनणं हा देखील एक व्यवसाय आहे, ज्यामध्ये अनेक सामान्य नोकऱ्यांपेक्षा जास्त पैसे कमावता येतात. आता युट्युब हा प्लॅटफॉर्म नेमका कधी सुरू झाला आणि त्यावर पोस्ट केलेला पहिला व्हिडिओ कोणता होता? यामागील गोष्ट देखील खूप मनोरंजक आहे.

केव्हा झाली युट्युबची सुरुवात?

स्टीव्ह चेन (Steve Chen), चाड हर्ले (Chad Hurley) आणि जावेद करीम (Jawed Karim) यांनी 2005 मध्ये युट्युबची (YouTube) सुरुवात केली होती. मात्र, नंतर या तिघांनी ते Google ला 165 कोटींना विकलं. आज या अ‍ॅपची क्रेझ अशी आहे की दर महिन्याला 200 अब्जांहून अधिक वापरकर्ते याचा वापर करतात. रिपोर्टसार, लोक दररोज 1 अब्ज तासांपेक्षा अधिक वेळ युट्युबवर घालवतात.

पहिल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं होतं?

या प्लॅटफॉर्मवरील पहिला व्हिडिओ 2005 साली 24 एप्रिल रोजी रात्री 8:27 वाजता अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ YouTube सह-संस्थापक जावेद करीम (Jawed Karim) यांनी अपलोड केला. या व्हिडिओचं शीर्षक (Title) ‘मी अ‍ॅट द झू’ आहे. 19 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जावेद हत्तींबद्दल बोलत आहे. ते म्हणत आहेत, ‘इथे आम्ही हत्तींसमोर उभे आहोत. हत्तींबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची सोंड खूप लांब असते आणि हे खूप चांगले आहेत.’

व्हिडीओला 291 कोटींहून अधिक व्ह्यूज

या व्हिडिओला आतापर्यंत 291 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, 4.09 कोटी लोकांनी त्यांच्या चॅनेलला सब्सक्राईब केलं आहे. तर 14 लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. मात्र, सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओशिवाय या चॅनलवर दुसरा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही. त्यांनी केवळ हा एकच व्हिडीओ अपलोड केला, त्यानंतर कोणताही व्हिडीओ अपलोड केलेला नाही.

दरम्यान, 14 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूब लाँच करण्यात आलं होतं. आज संपूर्ण जगात हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय झालं आहे. आज लोक या माध्यमातून तगडी कमाई करत आहेत. आजच्या काळात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनेल हे T Series आहे. या चॅनेलला 246 सब्सक्राईब्स आहेत. 

हेही वाचा:

Snowfall: काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी; पण परिणाम दिल्लीवरही, जाणून घ्या यामागील कारण

[ad_2]

Related posts