bjp leader pankaja munde dasara melava live update dasara melava at savargaon beed maharashtra marathi news politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pankaja Munde Live Updates : भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. याआधीच्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आता, मंगळवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात कोणत्या मुद्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

राज्यात दसऱ्यानिमित्ताने होणाऱ्या काही दसरा मेळाव्यांना महत्त्व आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा, शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा याचा समावेश होतो. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे चित्र दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधील एक गट कार्यरत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पंकजा यांना भाजपकडून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. मात्र, पंकजा या मध्य प्रदेशमध्ये फार सक्रीय नसल्याचेही म्हटले जात आहे. 

दसरा मेळाव्यात पंकजा कोणत्या मुद्यावर करणार भाष्य?

सावरगावच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या कोणत्या मुद्यावर भाष्य करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्याची राजकीय स्थिती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. पंकजा मुंडे आपल्या भाषणातून राजकीय आणि सामाजिक संदेश ही देणार असल्याची चर्चा आहे. 

बीडच्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. पंकजा मुंडे या सकाळी वैजनाथाचं दर्शन घेऊन त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर दाखल होतील आणि अभिवादन करतील. त्यानंतर सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रा काढली होती आणि यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली होती.  सध्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे यावर पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील देवीचे होम हवन केले. 

[ad_2]

Related posts