Dasara Melava Eknath Shinde Uddhav Thackeray Pankaja Munde Melava Marathi News



( प्रगत भारत । pragatbharat.com)


Dasara Melava : एक दसरा, तीन मेळावे; शिवाजी पार्क,आझाद मैदानावरुन तोफा धडाडणार दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे (Shiv Sena Dasara Melava)  लागले आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde) दसरा मेळावे होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava Speech) यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेचे बाण सोडले होते. यंदाच्या भाषणात उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील निशाण्यावर असणार आहेत. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Related posts