Pune Crime News Miscarriage Of A Woman Due To Kicking In The Stomach Shocking Incident In Wagholi Fir Registered Against Two

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime : विवाहितेच्या पोटात लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात (Miscarriage) झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune) वाघोली (Wagholi) परिसरात घडली आहे. या प्रकरणी विवाहितेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल मुकेश पवार (वय 21 वर्षे) आणि करण मुकेश पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विवाहिता आणि आरोपी हे वाघोली परिसरात राहतात. 26 मे रोजी गर्भवती महिला तिच्या आईसोबत रात्री घरी जात होती. त्यावेळी आरोपी राहुल पवारने गर्भवती महिलेच्या आईला शिवीगाळ केली. इतकंच नाही तर संबंधित विवाहितेच्या पोटात लाथ मारली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तक्रारदार महिलेला दगड फेकून मारलं. त्यावेळी पोटात दगड लागून रक्तस्राव झाला. या महिलेला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान या महिलेचा गर्भपात झाला.

हेही वाचा

Pune Crime News :  प्रेयसीने प्रियकराची हत्या का केली? वाघोलीतील हत्येचा धक्कादायक उलगडा

[ad_2]

Related posts