Former Union Minister Babanrao Dhakne Passed Away At Age Of 87 Ahmednagar Beed Maharashtra Mumbai News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Babanrao Dhakne Passes Away: माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचं निधन झालं असून ते 87 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर (Ahmednagar) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. 

[ad_2]

Related posts