Sugar Daddy Shweta Pundir Father Daughter instagram Viral Video Marathi News;बाप-लेकीच्या जोडीकडून बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक अनेकप्रकारचे व्हिडीओ बनवतात. फॉलोअर्सच्या लाईक्स, कमेंट्स मिळाव्यात यासाठी इन्फ्ल्यूएन्सर्स शक्कल लढवत असतात. अनेकदा हे फनी व्हिडिओ दिसतात. पण यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनला आहे.  ज्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत. 

बाप लेकीच नात हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. या नात्याबद्दल वाईट विचार मनात आणणेही अनेकांना पाप वाटते. त्यामुळे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेटकरी संतापले आहेत. श्वेता पुंदीर ही इन्स्टाग्रमावर आपले फोटो, रिल्स बनवत असते. तिला येथे 3 लाख 92 हजार फॉलोअर्स आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये वडील आणि मुलगी रील बनवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

वडील-मुलीची जोडी रील बनवताना दिसते. मुलगी म्हणते काका तुमच्यासाठी असतील, माझे शुगर डॅडी आहेत. यानंतर दोघांनी स्वत:ला ब्लँकेटमध्ये गुंडाळले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही नाराजी व्यक्त करत आहेत. @shwetapundir26 नावाच्या युजरने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

असे अनेक व्हिडिओ तिने तिच्या प्रोफाईलवर शेअर केले आहेत. याआधीही या पिता-पुत्रीने एक व्हिडिओ शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिचे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.

व्हिडिओ पाहून लोक संतापले

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘काहीतरी गडबड सुरु आहे. हे सर्व काय चालले आहे?’ तर’अशा लोकांवर बंदी घातली पाहिजे.’ असे दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे. 

इन्फ्लुएन्सर श्वेता पुंदीरने यावर कोणते स्पष्टीकरण दिले नाही. असे असले तरी तिने आपल्या प्रोफाईल बायोमध्ये अभिनेत्री, कॉमेडियन आणि व्लॉगर असे लिहिले आहे. तसेच त्याखाली परम धर्म तुम्हाला हसविणे असे कॅप्शनही लिहिले आहे. 

Related posts