Ajit Pawar Not Allow To Come In Baramati For Sugar Factory Pooja Maratha Reservation Maratha Morcha Waring

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांना बारामतीमध्येच येण्यास बंदी करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने  (Maratha Reservation) पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, आलात तर आंदोलन करु, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला येवू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि सकल मराठा समाजाची संयुक्त बैठक कारखान्याच्या शिवतीर्थ कार्यालयात झाली. ती बैठक निष्फळ ठरली. 

कारखान्याच्यावतीने उपमुख्यमंत्री पवार हे येणार, असे सांगण्यात आले तर मराठा समाजाच्यावतीने ते येऊ नये अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पुतळ्यासमोर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन  करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. जर अजित पवारांना मोळी पूजनाला बोलवले तर हजारोंच्या संख्येने आम्ही जमू त्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहिल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणे काही संचालकांनीदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. 

आधी पत्र, नंतर बैठक… तरीही भूमिकेवर ठाम

अजित पवारांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चानं विरोध केला होता. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले होते. अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. बारामती तालुक्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकांना बारामती फिरु देणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली. पत्र दिल्यानंतर आज सहकारी साखर कारखान्याच्यावतीने  पुन्हा एकदा या मुद्द्यावर पुनर्विचार करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली आणि त्यांनी येऊ नये, या भूमिकेवर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ठाम असल्याचं समोर आलं. 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : आंबदास दानवेंना विरोध करण्यासाठी जमलेल्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पाहा फोटो…

[ad_2]

Related posts