[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Rozgar Mela : दिवाळीपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 51,000 तरुणांना गिफ्ट देणार आहेत. उद्या (28 ऑक्टोबर 2023) होणाऱ्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदी हे सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांना नियुक्ती पत्र देणार आहेत. जून 2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी स्वतः घोषणा केली होती की, दीड वर्षात 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील. त्याच घोषणेनुसार ही भरती करण्यात येत आहे.
देशात एकूण 37 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन
सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे उद्या वाटप केलं जाणार आहे. पंतप्रधान दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याच्या या कार्यक्रमात सामील होणार आहेत. ज्यामध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जातील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी तरुणांना संबोधितही करणार आहेत. देशात एकूण 37 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच या मोहिमेशी संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या नियुक्त्या करण्यात येत आहेत. देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी हे रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य मंत्रालय यासारख्या सरकारच्या विविध विभागांतून आलेले आहेत.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य
रोजगार मेळावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी एक मोठे पाऊल आहे. रोजगार मेळा रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल. तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल. नियुक्त केल्या जाणार्या सरकारी कर्मचार्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर कर्मयोगी प्ररंभ या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी मिळेल. 750 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे कर्मचारी कुठूनही आणि कोणत्याही उपकरणाद्वारे त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात.
जून 2022 मध्ये पंतप्रधानांनी घोषणा केली होती की पुढील दीड वर्षात म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 10 लाख लोकांना मिशन मोडमध्ये सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. जून 2022 मध्ये पंतप्रधानांनी स्वतः सर्व सरकारी मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा आढावा घेतला, त्यानंतर भरतीचा निर्णय घेण्यात आला. उद्या देशात एकूण 37 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच या मोहिमेशी संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या नियुक्त्या करण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
PM Modi MP Visit : महाकाल नगरी उज्जैनमधून पंतप्रधान मोदी निवडणुकीचं रणशिंग फुंकणार, मध्य प्रदेशात भव्य सभा
[ad_2]