Maharastra Ssc Result 2023 151 Students With 100 Percent 108 From Latur Alone Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Latur Toppers SSC : यंदा दहावीच्या निकालात लातूर पॅटर्न अव्वल ठरल्याचं दिसत आहे. 100 टक्के गुण मिळवणाऱ्या 151 विद्यार्थ्यांमध्ये 108 विद्यार्थी एकट्या लातूर विभागाचे असल्याने लातूर पॅटर्नची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. पिढ्या बदलतात मात्र शिक्षणातील लातूर पॅटर्नचे नाव मात्र कायम असल्याचं दिसत आहे. यंंदा लातूर विभागाचा निकाल 92.67 टक्के लागला आहे तर विभागातील 398 शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

लातूर शहरात शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पालक आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी लातूरला पाठवत असतात. त्यातदेखील आपल्या पाल्याला लातूर शहरातील काही नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आग्रही असतात. यावरुन लातूरमध्ये चांगल्या दर्जाचा शैक्षणिक पॅटर्न सेट झाल्याचं लक्षात येतं. त्यामुळे यंदा 108 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  शरद गोसावी यांनी सांगितलं आहे. 

लातूर पॅटर्नची चर्चा…

शिक्षण विभागात किंवा क्षेत्राच चांगल्या उपाययोजना याव्या, याासाठी कोणत्याही सरकारवर किंवा शाळा प्रशासनावर अवलंबून न राहता सुमारे 45 वर्षांपूर्वी लातूरच्या देशी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शि. वै. खानापुरे यांनी शिक्षकांसमोर कल्पना मांडली. कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता शाळा संपल्यानंतर विशेष वर्ग, विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचा अभ्यास करून घ्यावा, त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि विद्यार्थ्यांची योग्य काळजी घ्यावी, अशी कल्पना शिक्षकांसमोर मांडली होती. त्यानंतर शिक्षकांनी या कल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. नंतर हीच कल्पना लातूरमधील अनेक शाळांनी स्वीकारली आणि त्यानंतर शाळांची गुणवत्तादेखील वाढली. ही शाळांची वाढती गुणवत्ता पाहून राज्यातील अनेक शाळांमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांचीदेखील गुणवत्ता वाढली. त्यानंतर राज्यात या लातूर पॅटर्नची चर्चा जोरदार सुरु झाली. 

कोणत्या विभागात किती विद्यार्थी?

राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151 आहे. त्यात लातूरमध्ये 108, पुणे 5, औरंगाबाद 22, मुंबई 6,अमरावती 7, कोकणातील 3 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यात शंभर टक्के निकाल लावताना ग्रेस गुणांचाही विचार करण्यात येतो.

100 टक्के विभागनिहाय शाळा 29.74 टक्के  

पुणे- 1240 शाळा
नागपूर- 709 शाळा
औंरगाबाद- 644 शाळा
मुंबई- 979 शाळा
कोल्हापूर- 1089 शाळा
अमरावती- 652 शाळा
लातूर- 383 शाळा
कोकण -427 शाळा

संबंधित बातमी-

Maharashtra SSC Result 2023 : गुणपत्रिका ‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करा; पण शाळेत मिळणार 14 जूनला!

[ad_2]

Related posts