Ahmednagar Burudgaon Gram Panchayat Member Resignation For Maratha Reservation Manoj Jarange Protest 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर आंदोलन होत असताना अहमदनगर जिल्ह्यातल्या बुरूडगाव ग्रामपंचायतीने (Burudgaon Gram Panchayat) आता राजीनाम्याचं अस्त्र उपसलं आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी करत या गावातील सरपंचासह 11 पैकी 9 ग्रामपंचायत सदस्यांनी आपला राजीनामा दिला आहे. तर उर्वरित दोन सदस्य सोमवारी राजीनामे देणार आहेत. त्यामुळे राजकारण्याना गावबंदी होत असताना दुसरीकडे आता ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजीनाम्याची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. 

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अहमदनगरपासून जवळच असलेल्या बुरूडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी सामूहिक राजीनामा दिला आहे. 11 सदस्य संख्या असलेल्या 9 सदस्यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यात लोकनियुक्त सरपंचाचाही सहभाग आहे.

राजीनामा देणाऱ्या सदस्यांची नावं

सरपंच- अर्चना कुलट, 
उपसरपंच महेश निमसे, 
सदस्य- सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डिले,अक्षय चव्हाण, नयना दरंदले, शीतल ढमढेरे, रुख्मिणी जाधव, रंजना कुलट यांनी राजीनामा दिला आहे.

ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाचारणे आणि शालन क्षेत्रे हे दोन सदस्य देखील उद्या राजीनामा देणार आहे. तर बुरूडगावाने राजकीय नेत्यांना गावबंदी देखील केली आहे. दरम्यान बुरूडगाव येथे आज शांततेच्या मार्गाने कँडल मार्च देखील निघाला. या मार्चमध्ये लहानग्यांपासून महिला-पुरुषांनी सहभाग घेतला आहे.

राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगेचं आवाहन

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आमदार आणि खासदारांनी राजीनामे देऊ नयेत असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना म्हटलं की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल.  राजीनामे देण्या पेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकार ला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही असं जरांगे म्हणाले.

तुम्ही भावनिक होऊ नका – मनोज जरांगे 

तुमची माया मी लोटून लावत नाही. पण पाणी पिऊन आणि सलाईन लावून आपल्याच लेकरांचा घात होऊ शकतो. आपल्या न्यायाचा दिवस जवळ आलाय. कोणाला तरी एकाला जीवाची बाजी लावून लढावे लागेल. मला माझ्या वेदना माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही भावनिक होऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts