Shivsena Sanjay Raut Reaction On Devendra Fadanvis Statement On Eknath Shinde Disqualification News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जरी अपात्र ठरले तरी तरी आम्ही त्यांना विधानपरिषदेवर पाठवू आणि त्यांना मुख्यमंत्री करू असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असे म्हणतात, शिंदे अपात्र ठरल्यावर काय करायचा हा पर्याय फडणवीसांकडे आहे, पण मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) काही नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. 

जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मुख्यमंत्री आणि दोन-दोन उपमुख्यमंत्री निर्दयीपणे राज्य करतात. पंतप्रधान मोदी शिर्डीत आले होते तेव्हा त्यांना हा प्रश्न माहीत नव्हता का? एका विमानाने जरांगे यांना दिल्लीला घेऊन जा आणि आरक्षणाचा निर्णय घ्या असं संजय राऊत म्हणाले. 

फडणवीसांना आताच जात का आठवली?

भाजपला जातीपातीत दंगली पेटवायच्या आहेत असं सांगत संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले ते ब्राम्हण आहेत. फडणवीस तुम्हाला आज तुमची जात का आठवते आहे? कारण तुमची कारस्थानं उघडी पडली आहेत. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. इथे कुणी जात विचारत नाही. सरकारला आरक्षणाचा विषय झेपत नसेल तर राजीनामा द्यावा. 

शिवसेना नसती तर मराठी माणसाला उपऱ्यांची भांडी घासावी लागली असती 

आम्ही जेव्हा दिल्लीत जातो तेव्हा देशातील खासदार सेनेच्या खासदारांकडे आदराने पाहतात. आमच्या आयुष्याचे सोने बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. जर सेना नसती तर मराठी माणसाला उपऱ्यांची भांडी घासायला लागली असती. मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. 

नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना शिवसेनेचे नेतेपद मिळाले होते. शिंदे यांना आता नेतेपद मिळाले. सेनेत तोलून मापून पदे दिली जातात असं संजय राऊत म्हणाले. 

गुन्हेगारीचा शिक्का म्हणजे मेडल आहे. माझ्यावर 140 केसेस आहे. मला रोज कोणत्या ना कोणत्या कोर्टात जावं लागतं. सध्या सरकारला काही विचारले तर तुरुंगात जावे लागते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह माझ्या सहकाऱ्यांना त्रास होतो. काही केलं तरी आम्ही भगवा झेंडा सोडणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार आपण केलं. 

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी चांगले काम काम केलं. तिकडे उत्तर प्रदेशात गंगा नदीत प्रेत वाहत होती अशी टीका संजय राऊत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 कोटींचा सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळ्यावर भाष्य केलं आणि त्यानंतर 72 तासात अजित पवार सत्तेत गेले. अनेक नेत्यांची जागा तुरुंगात होती त्यांना पण ते आज सत्तेत आहेत अशीही टीका संजय राऊतांनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, आज राज्यातल्या 14 महानगर पालिकेवर प्रशासक आहेत. निवडणुका घ्यायला पाहिजेत परंतु ते घेत नाहीत. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुका घेणार नाहीत आणि हुकूमशहा म्हणून राज्य करतील. एकतर हुकूमशहा पळून जातो किंवा रस्त्यावर मारला जातो, हा जगाचा इतिहास आहे हे लक्षात ठेवा.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts