Lalit Patil Drug Case Sassoon Dean Letter To Jail Lalit Is Suffering From TB Maharashtra Pune News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातल्या ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या (Sasoon Hospital Drug Racket) ललित पाटील बाबत रोज नव्याने गोष्टी समोर येत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर हे ड्रग माफिया ललित पाटीलवर मेहरबान असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. ललितला टीबी झाल्याचं ससूनच्या डीनचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागले आहे. या पत्रानंतर  ससूनचे डीन यांची फूस असल्यानेच ललित पाटील (Lalit Patil) रुग्णालयात राहिला या चर्चांना बळ मिळत आहे.

ललित पाटीलचा चार महिने मुक्काम ससूनमध्ये होता वेगवेगळ्या आजारांची कारणं देत ललित ससूनमध्ये तळ ठोकून होता. ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याच पत्र मागील महिन्यात ससुनच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिलं होतं.  हे पत्र एबीपी माझाच्या हाती लागलय. 7 सप्टेंबर 2023 च्या या पत्रात संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी.बी. झाला असून त्याला पाठदुखीचा देखील त्रास होत असल्याच म्हटले आहे. त्याचबरोबर ललित पाटीलला ओबेसीटी (Obecity)  म्हणजे लठ्ठपणाचा देखील त्रास असल्याच या पत्रात नमूद करण्यात आलय.

ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला वेगवेगळे आजार असल्याच कागदोपत्री दाखवण्यात येत होतं. ससून रुग्णालयात भरती असलेल्या ललित पाटीलची माहिती घेण्यासाठी येरवडा कारागृहाकडून विचारणा झाल्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याच उत्तर या पत्रात दिलय. ललित पाटीलला तीन वर्षांच्या कालावधीत अनेक आजार झाल्याच ससून रुग्णालयाने दाखवले आहे.

ललित पाटीलला तीन वर्षात झालेले आजार

  • 12 डिसेंबर 2020 ला ललित पाटील हिंजवडी पोलीस स्टेशनमधील जिन्यावरून पडल्याच कारण देत त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं. 
  •  पुढे त्याला हर्नियाचा त्रास असल्याच सांगून त्याचा मुक्काम वाढवण्यात आला. 
  •  ललित पाटीलला पाठदुखीचा आजार जडल्याचा दावा डॉक्टरांनी केला.
  • ललित पाटीलला लठ्ठपणाचा त्रास होत असून बॅरिएट्रिक सर्जरी करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल. 
  • तर सप्टेंबर महिन्यात ललित पाटीलला  टी. बी . झाल्याच डॉक्टरांनी जाहीर केले.

ललित पाटीलचा चार महिने मुक्काम ससूनमध्ये होता वेगवेगळ्या आजारांची कारणं देत ललित ससूनमध्ये तळ ठोकून होता.तातडीने हर्नियाचं ऑपरेशन करायचं असल्याचं सांगण्यात आलं होतं.त्याच्यावर हर्नियाचे उपचार सुरु असल्याचंदेखील सांगितलं गेलं. मात्र हर्नियावर उपचार करण्यासाठी चार महिने लागत नाही, असं या डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे ललित पाटीलवर बोगस उपचार सुरु होते का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  ससूनचे डीन संजीव ठाकूर ललितला ससूनमध्ये आश्रय देत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा :

Lalit Patil drug Case : ललित पाटीलनं पळून जाण्याचा प्लॅन ससूनमध्येच आखला; सगळं ठरल्या प्रमाणं झालं अन्…; ललितचा पळून जाण्याचा घटनाक्रम आला समोर

[ad_2]

Related posts