( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shani Margi In Kumbh Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी काही ग्रह वक्री चाल आणि सरळ चाल चालतात. नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शिवाय हा सर्वात क्रूर ग्रह असून लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे शनीच्या स्थितीत थोडासा बदलही प्रत्येकाचं टेन्शन वाढवतो.
सुमारे 30 वर्षांनंतर शनी स्वतःच्या कुंभ राशीत बसला आहे. आता दिवाळीपूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता शनी थेट कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. शनीची थेट हालचाल अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. परंतु यावेळी काही राशीच्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या राशींना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया शनि मार्गस्थ झाल्यामुळे कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागणार आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
शनी मार्गस्थ झाल्याने कर्क राशीच्या लोकांसाठी काही समस्या वाढू शकतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. यश आणि लाभाची शक्यताही कमी आहे. आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्हाला कामाच्या बाबतीत थोडेसं दडपण जाणवणार आहे. व्यवसायाबाबत थोडं सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागू शकतं अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांनाही काही चढ-उतारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शनी मार्गी झाल्यावर या राशीच्या सातव्या भावात स्थित असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता असते. प्रत्येक कामात विलंब झाल्यामुळे तुम्हाला मानसिक दडपण जाणवेल. नोकरीबाबत तुम्ही खूप निराश होऊ शकता. भागीदारी व्यवसायात काही मतभेद होऊ शकतात. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्हाला कौटुंबिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
या राशीमध्ये शनि मार्गस्थ असेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांची काही चिंता वाढू शकते. शनी मार्गस्थ असल्यामुळे जीवनात अनेक कौटुंबिक समस्याही उद्भवू शकतात. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातही काही अडचणी येऊ शकतात. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )