( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shashi Rajyog: करवा चौथ अतिशय खास मानली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. तर याच दिवशी संध्याकाळी चंद्र पाहून उपवास सोडतात. हिंदू धर्मात या व्रताचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक शुभ योगही तयार होतायत. करवा चौथच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत असल्याने शशी नावाचा राजयोग तयार होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी मंगळ, बुध आणि सूर्य तूळ राशीत राहणार आहेत. यावेळी शनी कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होतोय. वृषभ राशीत चंद्राच्या आगमनामुळे शशी राजयोग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. अशा परिस्थितीत करवा चौथचा दिवसी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.
वृषभ रास (Vrishabha Zodiac)
करवा चौथला चंद्र या राशीत असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शशी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून तुमची सुटका होणार आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. यावेळी एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्येही प्रगती होऊ शकते. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
कन्या रास (Kanya Zodiac)
कन्या राशीच्या लोकांना शशी राजयोग तयार झाल्याने विशेष लाभ मिळू शकणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायातही सतत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातच आनंद येऊ शकतो.
कर्क रास (Kark Zodiac)
करवा चौथच्या दिवशी तयार झालेला शशी योगही या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. शशी राजयोग बनल्याने वैवाहिक जीवनात केवळ आनंद मिळू शकतो. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढेल. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )