Due To Diwali And Christmas Holidays Konkan And Goa Railway Bookings Are Full

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : दिवाळी (Diwali 2023) आणि त्यानंतर येणाऱ्या नाताळ सुट्टीचा बेत नागरिकांनी आतापासूनच आखला आहेत. त्यामुळे राज्यात धावणाऱ्या अनेक मेल-एक्सप्रेसचे तिकीट वेटिंगवर गेले आहे. विशेषत: डिसेंबर महिन्यात कोकण आणि गोवा मार्गावरील गाड्यांचे तिकीट फुल्ल झालं आहे. 

नाताळाच्या सुट्टीच्या निमित्ताने  पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळाची निवड करतात. सुट्टीचा हंगाम सुरु असल्याने गोवा आणि कोकणात  मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. कोकणात पर्यटकांना स्कूबा डायव्हींग, बॅक वॉटर सफारी, जलक्रीडा साहसी खेळ अनुभवता येतात. तसेच कोकणी खाद्य पदार्थांचा आस्वाद आणि मेजवानीचीही चव चाखता येते. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात.सुट्टीचा हंगाम आणि सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात. 

निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे

नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळतातय. तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून जातात. तळकोकण आणि पर्यटनाचं नातं अलीकडे अधिक दृढ होत चाललं आहे. गोव्यापाठोपाठ आता सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंदी मिळू लागली आहे. तळकोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून जातात. 

देश- विदेशातून येतात पर्यटक

 डिसेंबरमधील ख्रिसमस आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांचा कालावधी, त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुण्यासह देश विदेशातून येणार्‍या पर्यटकांसाठी कोकण किनारपट्टी डेस्टिनेशन ठरली आहे. डिसेंबर महिना म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीचाच असतो. नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत हा योग साधण्यासाठी पर्यटकांनी सुट्ट्यांचे काही महिन्यांपूर्वीच नियोजन केलेल असत. नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी मालवण, तारकर्ली, देवबाग, देवगड, भोगवे, शिरोडा, चिवला समुद्र किनार्‍यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. यासाठी यावेळी हॉटेल, घरगुती राहण्याची सोय असलेली ठिकाणे पर्यटकांनी या आधीच हाऊसफुल्‍ल झाली आहेत.

रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होण्याची शक्यता

 सणासुदीला रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वे तिकीटाची अवैध विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. 

हे ही वाचा :

Pune Nagpur Train : दिवाळीत आरामात घरी जा! आता पुणे- नागपूर प्रवासाची चिंता मिटली, रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

[ad_2]

Related posts