MNS Chief Raj Thackeray Demand For Special Session Of Maharashtra Legislative Assembly On Maratha Reservation Manoj Jarange Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raj Thackeray on Maratha Reservation: एकिकडे राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे मराठा आंदोलनाला राज्यभरात हिंसक वळण लागलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनोज जरांगेंना उद्धेशून पत्र लिहिलं आहे. तसेच, या पत्रातून राज ठाकरेंनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिकाही मांडली आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं पत्र ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, “मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की, त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं ‘विशेष अधिवेशन’ भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा.”

राज ठाकरेंची उपोषण थांबवण्याची जरांगेंना विनंती 

राज ठाकरे आपल्या पत्रात पुढे म्हणाले आहेत की, “तोपर्यंत विनंती अशी की, तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाज-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत रहातात. हे बदललं पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. ‘सर्व मराठी एक’ असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू.”

उपोषण सोडा, तब्येत जपा; राज ठाकरेंचं मनोज जरांगेंना आवाहन 

राज ठाकरेंनी आपल्या पत्राचा शेवट करताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना आपलं उपोषण थांबवण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे म्हणाले आहेत की, “पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे.”

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Raj Thackeray: जरांगेंच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी राज ठाकरे मैदानात, पत्र लिहून मनोज जरांगेंना मोठं आवाहन!

[ad_2]

Related posts