Prime Minister Narendra Modi Reached At Odisha Balasore Railway Accident Place Also Visit To District Hospital To Meet Injured People Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Odisha Train Accident: संपूर्ण देशभरात सध्या ओडिशामधील रेल्वे अपघातामुळे (Railway Accident)  हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात झालेला हा सर्वात मोठा अपघात असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे. या अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनास्थळी पोहचले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कटकमधील रुग्णालयात जाऊन जखमींची देखील भेट घेणार आहेत.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. या अपघातात अनेक लोकं गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी देशातल्या विविध भागातून तज्ञ डॉक्टरांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. रेल्वेच्या अपघातातील हा सर्वात मोठा अपघात असल्याचं मानलं जात आहे इतकी या अपघाताची तीव्रता असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. 

पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा

 पंतप्रधानांनी घटनास्थळी पोहचून बचावकार्य करत असलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांच्यासोबत यावेळी बालासोरचे स्थानिक खासदार प्रतापसिंह सारंगी देखील यावेळी उपस्थित होते.या अपघातासंदर्भात आता पुढील भूमिका काय असणार यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली.ओडिशा मंत्र्यांनी घटनास्थळी कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत यासंदर्भातली  माहिती पंतप्रधान मोदींना दिली आहे. 

हजारो लोक या अपघातामध्ये अडकले होते ज्यांना वाचवण्याचं काम काल रात्रीपासून बचाव पथकाकडून करण्यात येत होते. अनेक लोकांना यामधून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. परंतु या सर्व बोगी रेल्वे रुळावर तशाच पडून आहेत. त्यांना बाजूला सारण्याचे काम सध्या रेल्वेकडून करण्यात येत आहे. तसेच अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. 

विरोधकांचा सरकावर टीकास्त्र

ओडिशामध्ये झालेल्या या अपघातामुळे विरोधकांनी मात्र टीकेची झोत सुरु केली आहे. हा अपघात थांबवता आला असता असा दावा सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील सरकारवर टीका करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.  अपघात झालेल्या दोन्ही रेल्वेमध्ये अपघात थांबवण्यास मदत करणारी प्रणाली नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे.

news reels Reels

महत्त्वाच्या इतर बातम्या :

….तर थांबवता आला असता रेल्वेचा अपघात? रेल्वेची सुरक्षा प्रणाली ‘कवच’चे काय झालं?

 

[ad_2]

Related posts