PAK Vs BAN Match Highlights ODI WC 2023 Pakistan Won By 7 Wickets Bangladesh Out Of World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PAK vs BAN Match Highlights : सलग चार पराभवानंतर अखेर पाकिस्तान संघाला विजय मिळाला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर पाकिस्तान संघाने बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव केला. बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 204 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाने हे माफक आव्हान फक्त तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. बांगलादेश संघाचा सलग सहावा पराभव झाला असून त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. पाकिस्तान संघाने सातव्या सामन्यात तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह पाकिस्तान संघाने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत.

पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत – 

बांगलादेशने पाकिस्तानसमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तान संघाने हे आव्हान 32.3 षटकात आणि तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. पाकिस्तानकडून सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि फखर जमान यांनी शानदार खेळी केली. अब्दुल्ला शफीक आणि फखर जमान यांच्यात पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी झाली. अब्दुल्ला शफीकने  69 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तर फखर जमानने 74 चेंडूत 81 धावांचो मोलाचे योगदान दिले.  त्याने या खेळीत 3 चौकार आणि 7 षटकार ठोकले. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने 9 षटकांत 60 धावांत 3 खेळाडू बाद केले. याशिवाय तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, शाकिब अल हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांना यश मिळवता आले नाही. या विजयामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. 

बांगलादेशचे फलंदाज फ्लॉप –

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.    शाकिब अल हसनचा संघ 45.1 षटकात 204 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून महमुदुल्लाहने 70 चेंडूत सर्वाधिक 56 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने 64 चेंडूत 43 धावा केल्या. त्याने या खेळीत 4 चौकार लगावले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 

पाकिस्तानचा भेदक मारा 

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी शानदार गोलंदाजी केली. शाहीन आफ्रिदीने 9 षटकांत 23 धावांत 3 खेळाडूंना तंबूत पाठवले. तर मोहम्मद वसीम ज्युनियरने 8.1 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले. हरिस रौफने 8 षटकात 36 धावा देत 2 फलंदाजांना तंबूच रस्ता दाखवला. याशिवाय इफ्तिखार अहमद आणि ओसामा मीरने 1-1 विकेट घेतली.

[ad_2]

Related posts