First Time That Sachin Pilot Has Disclosed His Separation From Sara Pilot Abdullah Pilot Election Affidavit Farooq Abdullah Aaran And Vehaan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जयपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि राजस्थानचे (Rajasthan) माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या पत्नी सारा पायलट (Sachin Pilot Divorced) यांचा घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थान निवडणुकीसाठी सचिन पायलट यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर दोघांचा काडीमोड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी विवाहितच्या ठिकाणी घटस्फोटित उल्लेख केल्यानंतर देशात एकच चर्चा रंगली. जाती धर्माच्या भिंती तोडणारी ही प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. 

सचिन आणि सारा यांची प्रेमकथा आणि नंतर लग्न ही फिल्मी कथेपेक्षा कमी स्टोरी नाही. पण या प्रेमाचा शेवट होणार आहे, याचा कोणी विचारही केला नव्हता. दोघेही एकत्र असल्याचे सर्वांना माहीत होते, पण 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन पायलट यांनी पत्नीच्या नावाऐवजी घटस्फोट लिहून प्रेम संपल्याची माहिती दिली.


 

ज्या पद्धतीने सचिन पायलटय यांनी घरच्यांना न कळवता साराशी लग्न केले. तसेच दोघांच्या घटस्फोटाची बातमी (Sachin and Sara Pilot Divorced) कोणाच्या कानापर्यंत पोहोचू दिली नाही. सचिन पायलट आणि सारा पायलट 2018 साली एकत्र होते. आता सचिन पायलट यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात घटस्फोट झाल्याची माहिती दिली आहे. दोघांमध्ये घटस्फोट कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला? कोणालाच कळले नाही. सचिन पायलट यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन मुलांची नावे लिहिली आहेत. यावरून अरण आणि विहान दोघेही सचिन पायलटसोबत राहणार असल्याचे स्पष्ट होते.

सारा या दिल्लीचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा कन्या

सचिन पायलट माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे चिरंजीव आहेत. दिल्लीतील शालेय शिक्षणानंतर सचिन उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. सचिन पायलट यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याठिकाणीच सारा कॉलेजमध्ये शिकत होत्या. सारा या दिल्लीचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचा कन्या आणि उमर अब्दुल्ला यांची बहीण आहे. एकत्र शिकत असताना सचिन आणि सारा यांच्यात जवळीक वाढली. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले.

विरोधाला न जुमानता सचिन आणि सारा यांनी लग्न केले

लंडनहून भारतात आल्यानंतर जेव्हा सचिन आणि साराच्या कुटुंबियांना सचिन आणि साराच्या प्रेमकहाणीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड राग आला. घरच्यांची नाराजी असतानाही सचिन आणि सारा या दोघांनीही एकमेकांची शपथ घेतली. ते गुपचूप भेटत राहिले आणि त्यांचे प्रेम सुरूच राहिले. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता सचिन आणि सारा यांनी 2004 मध्ये लग्न केले.लग्नानंतर काही महिन्यांनी घरच्यांना याची माहिती मिळाल्यावर मोठा विरोध झाला.

मुलीच्या प्रेमापुढे झुकावे लागले 

सचिन पायलट हिंदू आणि सारा मुस्लिम आहेत. दोन भिन्न धर्मांमुळे दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला विरोध होता. लग्नानंतर सचिन आणि सारा एकत्र राहू लागले. काही काळानंतर सचिनचे कुटुंबीय राजी झाले पण साराचे कुटुंब बराच काळ नाराज राहिले. साराने आपल्या कुटुंबीयांना स्पष्टपणे सांगितले की ती आपला निर्णय बदलणार नाही. शेवटी साराच्या कुटुंबालाही त्यांच्या मुलीच्या प्रेमापुढे झुकावे लागले.

सचिन आणि सारा पायलट यांना दोन मुलगे 

सचिन आणि सारा पायलट यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा अरण पायलट आणि धाकटा विहान. 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या शपथविधी सोहळ्याला पायलटचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी सचिनचे सासरे फारुख अब्दुल्ला हे त्याची पत्नी सारा पायलट, त्यांची दोन मुले अरण आणि विहान यांच्यासह उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts