Bala Nandgaonkar On Maratha Reservation Said Raj Thackeray Uddhav Thackeray Should Be Called To The Meeting

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर मंथन व्हायचं असेल तर सर्वपक्षीय सहकार्याची गरज होती, सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही बोलवायला पाहिजे होतं, त्यांनीही आपलं मत व्यक्त केलं असतं असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले. जरांगेनी उपोषण सोडायला पाहिजे हे सर्वांना वाटतं, मात्र हा मुद्दा सामोपचाराने सोडवायला हवा असंही बाळा नांदगावकर म्हणाले. 

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, राज्यात सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण झाला आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आत्महत्येची प्रकरणं वाढवली आहे, जरांगेंच्या तब्येतीची चिंता सतावते आहे. राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे. आमदार जरी असले तरी पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका मांडली असती मात्र तुम्ही बोलवलंच नाही. सर्वांना बोलवलं असतं तर राज ठाकरे यांनी देखील भूमिका मांडली असती. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष प्रमुखांनी देखील भूमिका मांडली असती. हा प्रश्न ज्वलंत विषय आहे, त्यामुळे सरकारनं हे बरोबर केलं नाही. 

चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी करत बाळा नांदगावकर म्हणाले की, सर्वपक्षीय सहकार्य करणं गरजेचं होतं तर सर्वांनाच बोलवायला पाहिजे होतं. विचारमंथन करणं गरजेचं होतं तर ही लोक देखील येणं गरजेचं होतं. आरक्षणाला कोणी नाही म्हणत नाही, मग चार दिवसांचं अधिवेशन घ्या, त्यात आरक्षण कसं देणार हे देखील कळू द्या. सर्व पक्षीय चर्चा नंतर केंद्राला ठराव पाठवा. सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊ जा, मात्र देणार कसं हे सांगा? विशेष अधिवेशन बोलवत सर्व पक्षीयांची भूमिका येऊ द्या.

जातीला पोट असतं, पोटाला जात नसते, शेवटी रिकामे पोट आहे. ज्यांची चूल पेटत नाही त्यांना आरक्षणाची गरज आहे. राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे, त्यांची स्पष्ट भूमिका आहे. तुम्हाला लोक फसवत आहेत, तेव्हाच राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. सर्वांना विश्वासात घेत सरकारनं मार्ग काढायला हवा. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts