cricket mohammad shami wife hasin jahan cryptic post bhainsa ka dudh le rahi hu

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hasin Jahan Post : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup-2023) टीम इंडियाने विजयाची घोडदौड सुरुच ठेवली आहे. रोहत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सलग सहा विजय मिळवलेत. टीम इंडिया बारा पॉईंटसह पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) जबरदस्त फॉर्मात आहे. विश्वचषकात शमीला पाचव्या सामन्यात संधी मिळाली आणि ही संधी त्याने हातची जाऊ दिली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शमीने तब्बल पाच विकेट घेत मॅच विनिंग कामगिरी केली. तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शमीने चार विकेट घेतल्या. विश्वचषकात शमीची दमदार कामगिरी होत असतानाच त्याच्या पत्नीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 

शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरुन नेटकरी जबरदस्त संतापले आहेत. हसीन जहाँ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. हसीन जहाँने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रेड्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसाबत एक कॅप्शनही तिने टाकलाय. यात तीने म्हटलंय ‘मी आणि अमरोहाचा रेडा, आता मी दूध घेतेय, काही दिवसांनी या रेड्याचं मटण खाईन’ हसीन जहाँने दोन फोटो शेअर केले असून यासोबत हसणारे इमोजीही शेअर केले आहेत. लोकेशनमध्ये तीने ‘अमरोहा’ असं लिहिलं आहे. मोहम्मद शमी हा उत्तर प्रदेशच्या ‘अमरोहा’ इथं राहातो.  त्यामुळे हसीनच्या पोस्टवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. 

हसीन जहाँने ‘अमरोहचा रेडा’ हा दिलेला कॅप्शन मोहम्मद शमीला डिवचण्यासाचसाठी टाकला असल्याच नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँदरम्यान घटस्फोटावरुन कोर्टात केस सुरु आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले आहे. 

नेटकरी संतापले
हसीन जहाँच्या या पोस्टवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. एका युजरने शमीने तुझ्यापासून वेगळा झाला हे चांगलंच झालं असं म्हटलंय आहे. तर एकाने या म्हशीसोबतच राहा असा टोमणा मारलाय. एका युजरने रेडा कधीपासू दूध द्यायला असा प्रश्न विचारला आहे.

हसीन जहाँचे शमीवर आरोप
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँदरम्यान घटस्फोटचं प्रकरण सध्या कोर्टात आहे. सप्टेंबर महिन्यात पश्चिम बंगलाच्या अलिपूर कोर्टाने मोहम्मद शमीला दोन हजार रुपायांच्या बॉन्डवर जामीन दिला आहे. 2018 मध्ये हसीन जहाँने जाधवपूर पोलीस स्थानकात मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. मोहम्मद शमीचे दुसऱ्या महिलांबरोबर संबंध असल्याचा आरोप केला होता. 

Related posts