Shubman Gill Sara Tendulkar Avoid Getting Photographed Together Viral Video Breaks Internet

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shubman Gill, Sara Tendulkar : टीम इंडियाचा युवा सलामी फलंदाज आणि सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या (shubman gill sara tendulkar dating rumors) चर्चा सोशल मीडियावर वारंवार होत असते. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा चाहत्यांनी शुभमन गिल (shubman gill) याला साराच्या नावाने डिवचलेही… वर्षभरापासून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरची चर्चा सुरुच आहे. याच चर्चेला आता आणखी खतपाणी मिळालेय. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जिओ वर्ल्ड प्लाजा येथील हा व्हिडीओ आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकत्र नव्हते… पण एकाच इव्हेंटमध्ये होते.. सारा तेंडुलकर जवळून शुभमन गिल निघाल्याचे व्हिडीओत दिसतेय. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या चर्चेला उधाण आलेय.  

पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ – 


मागील काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा होतोय. त्यांचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  दरम्यान, विशेष म्हणजे गिल आणि सारा अली तेंडुलकर डेटवर गेल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर गिल आणि सारा तेंडुलकरचे ब्रेकअप झाल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. मात्र आता या दोघांमध्ये पॅचअप झालं असल्याचं देखील बोललं जात आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही वर्ल्डकप सामन्यादरम्यान शुभमन गिलला चिअर अप करताना दिसली होती. 
 

टीम इंडिया विश्वचषकातील श्रीलंकेविरोधात सामना खेळण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. शुभमन गिल याने वेळातून वेळ काढून जिओ वर्ल्डला भेट दिली. त्यावेळी तिथे सारा तेंडुलकरही उपस्थित होती.  साराने लाल रंगाचा गाउन परिधान केला होता, ज्यात  ग्लॅमरस वाटत होती. तर शुभमन गिलने संपूर्ण ब्लॅक आऊटफिट घातले होते. या दोघांचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.




[ad_2]

Related posts