Mohammed Shami World Cup Record Most Wickets For India In WC 45 Wickets 14 Innings Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Most wickets for India in World Cups  : मोहम्मद सामीने यंदाच्या विश्वचषकात दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. शामीने यंदाच्या विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. आज वानखेडेच्या मैदानावर शामीने लंकेच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह त्याने विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम झहीर खान याच्या नावावर होता. पण आज हा विक्रम मोडीत निघाला. 

विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात शामी आता पहिल्या स्थानावर पोहचलाय आहे. शामीने आधी झहीर खान आणि जवागल श्रीनाथ या दोन दिग्गज गोलंदाजांना मागे टाकलेय. शामीने 14 सामन्यात 45 विकेट घेतल्या आहेत.  झहीर खान याने 23 सामन्यात 44 विकेट घेतल्या होत्या.  पाहूयात विश्वचषकात आघाडीचे पाच विकेट घेणारे गोलंदाज…
 
भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे आघाडीचे पाच गोलंदाज – 

1. मोहम्मद शमी (Mohammed Shami) :

विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये मोहम्मद शामी पहिल्या क्रमांकावर पोहचलाय आहे. मोहम्मद शामीने विश्वचषकाचे फक्त 14 सामने खेळले आहेत. या 14  सामन्यात शामीने 45 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. शामीने तीन वेळा पाच आणि चार वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या विश्वचषकातही मोहम्मद शामीकडून दमदार कामगिरीची आपेक्षा आहे. आतापर्यंत त्याने आपल्या गोलंदाजीने प्रभावीत केलेय. अनुभवी मोहम्मद शामी भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. 

2. झहीर खान (Zaheer khan) :

विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये झहीर खान दुसर्या स्थानावर आहे. 2011 च्या विश्वचषक विजयात झहीर खान याचा सिंहाचा वाटा होता. आयसीसीच्या महाकुंभामध्ये झहीर खान याने 23 सामन्यात 4.47 इकॉनॉमिनीने 44 विकेट घेतल्यात. झहीर खान याने विश्वचषकात 12 षटके निर्धाव फेकली अन् एक वेळा चार विकेट घेतल्या. 

3. जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) : 

भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ या तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. श्रीनाथने विश्वचषकाच्या 34 सामन्यात प्रतिनिधित्व केलेय.  जवागल श्रीनाथने 34 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथने विश्वचषकात दोन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथने विश्वचषकात 21 षटके निर्धाव फेकली आहेत.

 4. अनिल कुंबले (Anil Kumble) :

भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याचाही या यादीत समावेश आहे. अनिल कुंबळे याने विश्वचषकात भारतासाठी 18 सामने खेळले आहेत. या 18 सामन्यात 4.08 च्या अकॉनॉमीने 31 विकेट घेतल्या आहेत. 

5. कपिल देव (Kapil Dev) : 

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने 1983 चा विश्वचषक उंचावला होता. बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताने चषकावर नाव कोरले होते. या विजयात कपिल देव यांचा मोठा वाटा होता. कपिल देव यांनी विश्वचषकाच्या 26 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. कपिल देव यांनी 26 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही कपिल देव यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहेत. 

[ad_2]

Related posts