[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
राज्यात ७०० ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी २१० कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबईत सध्या १५५ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू आहेत. या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत ७ लाख ४३ हजार ५७० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. त्याची राज्यभर व्याप्ती वाढविण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली होती.
त्यानुसार पहिल्या टप्यात ७०० दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पुढील चार वर्षांसाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या धर्तीवरच संपूर्ण राज्यात हे दवाखाने सुरू करण्यात येतील.
15 डिसेंबरपर्यंत मुंबईत आपला दवाखानाचे 250 केंद्र सुरू होतील. रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात येणाऱ्या रुग्णांना पूर्ण मदत केली जाईल.
बीएमसीच्या अखत्यारीतील सर्व स्मशानभूमींच्या अपग्रेडेशनसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
जानेवारी 2024 पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे मुंबईत 554 ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. महिनाभरात येथे काम सुरू होत आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची ठिकाणे, कौशल्य विकास केंद्रे, पाळणाघरे किंवा बालकांच्या बसण्याची सुविधा, रुग्णांची मदत केंद्रे, स्मशानभूमी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, उद्याने, कचरा विल्हेवाट, मलबार हिल जलाशयाची क्षमता वाढवणे आदी मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
15 जानेवारीपासून मुंबईत 25 नवीन रुग्ण मदत केंद्रे सुरू होणार आहेत. स्मशानभूमींच्या नूतनीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्या असून जानेवारी २०२४ मध्ये काम सुरू होईल, असे लोढा यांना सांगण्यात आले. दिवाळीनंतर स्वतंत्र कचराकुंड्या वितरित केल्या जातील.
सोसायट्यांना सुका व ओला कचरा वेगळा करावा लागणार आहे.
मलबार हिल जलाशयाच्या विस्तारीकरणावरही बैठकीत चर्चा होऊन काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयआयटी मुंबईचे संचालक, बीएमसी अधिकारी आणि मलबार हिल येथील रहिवाशांनी सुचवलेल्या तीन आयआयटी प्राध्यापकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती महिनाभरात निर्णय घेईल.
हेही वाचा
Metro 4 : मुंबई ते ठाणे प्रवास करणाऱ्यांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळणार
डहाणू-विरार रेल्वे मार्गाचा विस्तार: हायकोर्टाकडून खारफुटी तोडण्यास परवानगी
[ad_2]