Hardik Pandya Worst Fears Confirmed As India Announce Replacement Player For ICC World Cup 2023 Team India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hardik Pandya Health Updates: 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यातही पांड्यानं केवळ तीनच चेंडू टाकले होते. यानंतर टीम इंडियानं मागील तीन सामने त्याच्याशिवाय खेळले आहेत. हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. तेव्हापासूनच चाहते हार्दिकच्या पुनरागमनाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, आता चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. ऑलराउंडर हार्दिक पांड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नाही.

[ad_2]

Related posts