Why Is Elon Musk S X Selling Unused Account Handles Now Here’s What You Need To Know X Has Started Selling Inactive Handles

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Buy Inactive User Accounts on X : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची कंपनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजेच यापूर्वीचं ट्विटर (Twitter) मध्ये नवी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता एलॉन मस्क एक्सवरील अकाऊंट (Unused Account Handles) ची नाव विकून पैसे कमावणार आहे. मस्कची कंपनी  ट्विटर (Twitter) म्हणजे एक्स (X) आता न वापरलेली खात्यांची नावं म्हणजे युजर नेम्स 50,000 डॉलरच्या किंमतीला विकत आहे. या नवी सेवेमागचा उद्देश निष्क्रिय खात्यांमधून वापरकर्त्यांची नावे मुक्त करणे आणि ते अकाऊंट युजरनेम इच्छुकांना आणि खरेदीदारांना उपलब्ध करून देणे, हे आहे.

मस्क आता यूजरनेम विकणार

फोर्ब्सच्या अहवालानुसार, एलॉन मस्क ट्विटर एक्सवर अकाऊंट युजरनेम विकणार आहे. जानेवारीमध्ये न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात असं म्हटलं होतं की, मस्क यांनी सक्रीय नसलेले अकाऊंट युजरनेम विकण्याच्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एक अब्जाहून अधिक सक्रिय युजरनेम मुक्त करण्याचा विचार आहे. आता फोर्ब्सच्या अहवालावरून कंपनीने या दिशेने पुढील पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचं दिसते.

युजरनेम विकण्यासाठी खास हँडल

फोर्ब्सच्या अहवालात समोर आलं आहे की, कंपनी एका समर्पित हँडलवर काम करत आहे. या हँडलवरून या सक्रिय वापरकर्त्यांची म्हणजेच जे युजरनेम एक्स मीडियावर वापरात नाही, अशी नावे विकण्यासाठी कार्यरत असेल. अहवालात असेही म्हटले आहे की, यासाठी एलॉन मस्क यांची कंपनी एक्स खरेदीदारांकडून 50,000 डॉलर म्हणजेच 41 लाख रुपये शुल्क आकारत आहे. हा ईमेल कंपनीच्या एका सक्रिय कर्मचाऱ्याने फोर्ब्सला पाठवला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, कंपनीने अलीकडेच त्यांच्या हाताळणी मार्गदर्शक तत्त्वे, प्रक्रिया आणि शुल्कामध्ये काही बदल केले आहेत.

मस्क यांनी यापूर्वीही संकेत दिले होते

ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी ही सक्रिय युजरनेम मुक्त करण्याचे संकेत दिले होते. मस्क यांनी ट्विटरवर या विषयावर एक पोस्ट देखील केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, बॉट्स आणि इतर खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात युजरनेम घेण्यात आली आहेत, जी आता सक्रिय आहेत आणि कंपनी भविष्यात ही नावे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनी या प्लॅनवर काम करत आहे की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही. पण, फोर्ब्सला मिळालेल्या ईमेलवरून कंपनीने या सक्रिय युजरनेम्सची विक्री सुरू केल्याची पुष्टी झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts