Pune Residents Hit By Nepal Earthquake Luckily 39 Passengers Are Safe Nepal Earthquake Latest Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : नेपाळमध्ये (Nepal News) शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपाचे धक्के बसले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने (Earthquake Updates) नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळत आहे. नेपाळ भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपातून  पुण्यातील 39 प्रवासी सुखरुप बचावले आहेत. नेपाळ चितवन (Nepal earthquake) जवळील सौरह ( Sourah near Chitwan) येथील रॉयल सफारी या हॉटेलमध्ये पुण्यातील (Pune Tourist) प्रवासी होते. अर्चीस  इंटरनेशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत हे प्रवासी गेले होते. मात्र हे सगळे प्रवासी सुखरुप असून ते काही दिवसात भारतात परतणार आहे. 

हॉटेलमध्ये जाणवले भुकंपाचे धक्के…

पुण्यातील या प्रवाशांचा पर्यटनाचा शेवटचा दिवस होता. पहाटे तीन वाजता पुण्यातील हे सर्व प्रवासी गोरखपूरहून पुण्याला निघणार आहेत. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हॉटेल रूमध्ये अचानक बेड हलू लागल्याने सर्व प्रवासी हॉटेल इमारतीतून सैरा-वैरा पळत मोकळ्या जागेत जमा झाले होते. मात्र, काही वेळाने या सगळ्या प्रवाशांना भूकंप झाल्याचं समजलं. त्यानंतर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सगळे प्रवासी सुखरुप असल्याचं पाहून अनेकांच्या जीव भांड्यात पडला.

रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू

भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. नेपाळमध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात दिसली. यावरून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावता येतो. बिहारमधील पाटणा आणि मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत.

नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी बचाव आणि मदतीसाठी तीन सुरक्षा एजन्सी तैनात केल्या आहेत. या भूकंपाचा प्रभाव उत्तर प्रदेशातील लखनौमध्येही दिसून आला, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. नेपाळ गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरुन निघाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या महिन्यात 22 ऑक्टोबरला झालेल्या भूकंपाचं केंद्रही नेपाळमध्ये होतं.

महत्वाच्या इतर बातम्या :

एक, दोन नाही, तर तब्बल 5 ईमेल; मुकेश अंबानींना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचं सत्र सुरूच, पोलिसांच्या हाती अद्याप काहीच नाही

[ad_2]

Related posts