IND vs SA Match :रोहित शर्माच्या भारतीय संघाचा विश्वचषकातला विजयरथ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दाखल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रोहित शर्माच्या भारतीय संघाचा विश्वचषकातला विजयरथ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दाखल झाला आहे. भारताचा विश्वचषकातला आठवा साखळी सामना हा उद्या तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ विश्वचषकात जबरदस्त फॉर्मात आहेत. भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म झालं असलं तरी, विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये मोठी चुरस आहे. या गुणतालिकेत भारतानं सातपैकी सात सामने जिंकून, सर्वाधिक १४ गुणांसह सध्या पहिलं स्थान पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं सातपैकी सहा सामने जिंकून, १२ गुणांसह दुसरं स्थान राखलं आहे. पण भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट किंचित सरस आहे. त्यामुळं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला साखळी सामना हा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट करणारा ठरण्याची शक्यता आहे. &nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts