Gunaratna Sadavarte Led ST Workers Union Call ST Workers Strike From 6th November 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  ऐन दिवाळीत एसटी बसने  (ST Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने सोमवार, 6 नोव्हेंबरपासून संपाची हाक (ST Workers Strike) दिली आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह  एसटी महामंडळालाही (MSRTC) याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सुर्फ संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की,  एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. या संपात 68 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ऐन दिवाळीत संपाचा एसटीला फटका?

मागील काही महिन्यापासून एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. त्याच्या परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून जादा वाहतूक चालवली जाते. त्यामुळे गणेशोत्सवानंतर दिवाळीच्या हंगामात एसटीच्या महसुलात वाढ होत असते. अशातच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिवाळीत संप पुकारल्यास एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. 

मासिक नफ्यात एसटी महामंडळ…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस.टी. बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाहतुकीची सेवा देते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती.त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 9000 कोटी रुपयांचा आतापर्यंत संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. 

सरकार आणि एसटी महामंडळ यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे हळूहळू एसटीची आर्थिक क्षमता रुळावर येत असल्याची परिस्थिती आहे. आज घडीला एसटी महामंडळ 1990 ते आतापर्यंत एकूण 9 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात आहे. मात्र आता मासिक आणि दैनंदिन तोट्याच प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे आता पु्न्हा एकदा एसटी कामगार-कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. 

[ad_2]

Related posts