Wardha Deoli Congress MLA Beaten Up To Gram Panchayat Member Bjp Demand Action Against Him

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वर्धा :  देवळीचे आमदार रणजित कांबळे (MLA Ranjit Kamble) यांना सभेत रस्त्याबाबत प्रश्न विचारला असता आमदाराने ग्रामपंचायत (Grampanchyat) सदस्याला मारहाण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव (Ganesh Satav) याने देवळी पोलिसांमध्ये केली आहे. या घटनेनंतरही आमदारांवर कारवाई होत नसल्याने  भाजपने पत्रकार परिषद (BJP) घेत कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सोनेगाव बाईच्या (Sonegaon Bai) सरपंचांनी सदर ग्रामपंचायत सदस्याने सभेत दारू पिऊन गोंधळ घातला असल्याची तक्रार देवळी पोलिसांत करण्यात आली आहे. एकमेकांवर होत असलेल्या आरोपांमुळे भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात वर्ध्यात स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे.  

देवळी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सोनेगाव बाई येथे 2 नोव्हेंबर रोजी  भूमिपूजन कार्यक्रम आयोजित होता. यावेळी भूमिपूजनानंतर कामे होत नसल्याचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव यांनी आमदारांना केला. यावर आमदार रणजित कांबळे संतापले, राग अनावर झाला आणि सदस्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप  ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव याने पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत देवळी पोलिसांत तक्रार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आमदारांनी प्रश्नाची उत्तरे द्यावी. कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. 

ग्रामपंचायत सदस्यात मारहाण करणे अयोग्य आहे. प्रोटोकॉलनुसार भूमिपूजन करावे. कामे पूर्ण करावी पण तसे होत नाही, त्यामुळे आमदार कांबळेंवर कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी केली आहे.  आमदार कांबळे यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा त्यांना गावबंदी करू, असा इशारा भाजप नेते राजेश बकाणे यांनी  दिला आहे. तर दुसरीकडे सोनेगावच्या कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्याने मद्य प्राशन करून गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार सरपंचांनी केली आहे. सोनेगाव (बाई) येथील सरंपचांनी यासंदर्भात देवळी पोलिसांत तक्रार केली आहे. 

[ad_2]

Related posts