Gram Panchayat Elections 2023 Voting For 16 General 28 Gram Panchayat By Elections At Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gram Panchayat Elections 2023: छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात (Maharashtra News) आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. शनिवारी म्हणजेच कालच मतदान (Voting) प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना निवडणूक विभागाच्या वतीने साहित्यांचे वाटप करून संबंधित गावाला पाठविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात देखील 16 सार्वत्रिक तर 28 ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी (Maharashtra Gram Panchayat Election 2023) आज मतदान होणार आहे. तर, सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत (NCP) झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत (Gram Panchayat Elections) निवडणूक होत असल्याने या निवडणुकीला महत्व आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी 9 तालुक्यातील 68 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात 16 सार्वत्रिक तर 28 ग्राम पंचायतीच्या पोटनिवडणुकांचा समावेश आहे. या दोन्ही निवडणुकीच्या सरपंच पदासाठी 48 तर सदस्यपदासाठी 294 उमेदवार रिंगणात उतरले आहे. तर एकही ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नाही. तर, प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक विभागातील 4 कर्मचारी तैनात असणार आहेत. सोबतच पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे. 

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी नऊ तालुक्यात मतदान केंद्रे

  • फुलंब्री 1 
  • छत्रपती संभाजीनगर 6 
  • सोयगाव 5 
  • गंगापूर 18 
  • कन्नड 3 
  • खुलताबाद 13
  • सिल्लोड 6 
  • पैठण 7 
  • वैजापूरातील 9

कोणत्या जागेसाठी किती उमेदवार…

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 16 सार्वत्रिक आणि 28 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीतून सरपंच पदासाठी 48 तर सदस्यपदासाठी 294 उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात या निवडणुका होणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी एक सरपंच आणि 39 सदस्य पदे रिक्त आहेत. सरपंच पदासाठी 5 तर सदस्यत्वासाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत.             

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                            

Gram Panchayat Elections 2023 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, बारामतीत अजितदादांच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल, तर नागपूर, ठाणे, बीडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

[ad_2]

Related posts